नाशिक उबाठात मोठा फेरबदल: विलास शिंदेंची हकालपट्टी, मामा राजवाडे नवे महानगरप्रमुख; शिंदेंचे डोळे पाणावले

Vilas Shinde : नाशिकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उबाठासेनेतील महानगर प्रमुख पदावर असलेले विलास शिंदे यांची पदावर हकालपट्टी करण्यात आली आहे. उबाठाचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. तसेच मामा राजवाडे यांची महानगरप्रमुख पदी निवड केली आहे.
पक्षातून हकालपट्टीची कारवाई होताच विसास शिंदे यांचे डोळे पाणावले होते. माझ्या भावना व्यक्त केल्या म्हणून माझ्यावर कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना सांगितले. तसेच 30 वर्ष मुलांकडे न बघता पक्षाचे काम केले. त्याच्या बदल्यात हे दिवस आले, अशी खंत विलास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. माझ्यापेक्षा अनुभवाने लहान असलेल्यांना जिल्हाप्रमुख केले असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
वसंत गीते यांनी सगळं मिळून सुद्धा अनेक पक्ष बदलले. संजय राऊत यांच्याकडे माझी नाराजी कळवली होती. नाशिकला आल्यावर बघू असे ते म्हणाले होते. मात्र त्यापूर्वीच कारवाई केली, असे म्हणत विलास शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पुढची भूमिका ठरविणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
काय म्हणाले विलास शिंदे?
फेरबदल करणे कोणाला पद देणे हा त्यांचा अधिकार आहे. शिवसेनेचे ते नेते आहेत, परवा माझ त्यांच्याशी बोलण झालं होतं. ज्या वेळेस एखाद्या प्रामाणिक शिवसैनिक आपल्या हक्कासाठी आपली बाजू मांडण्यासाठी पुढे येतो, त्याच्यावर कारवाई होते. नेते आले तर नेत्यांची हकालपट्टी होत नाही, अशी खंत शिंदेंनी बोलून दाखविली. शिवसैनिक एकत्रित येतात आणि आपल्यावर अन्याय होतोय हे सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशी गळचेपी होते. मी आदेशावर चालणारा शिवसैनिक असल्याचे त्यांनी निशून सांगितले.
….तर थांबण्याची पण माझी तयारी
एखादा माणूस ज्यावेळी नाराज होतो, त्यावेळी त्याला जवळ घेऊन त्याची विचारपूस करून त्याच्या भावना समजावून घेतल्या पाहिजेत. तुम्ही थेट पदावर काढून टाकले… असे किती लोकांना तुम्ही पदावर काढून टाकणार आहात असा संतप्त सवाल विलास शिंदे यांनी केला आहे. आज सगळ्यांची चर्चा करून जर पदाधिकारी म्हटले राजकारण करायचं नाही, तर थांबण्याची पण माझी तयारी आहे असे देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
हेही वाचा : ठाकरे बंधूंच्या एकत्रित मोर्चावर एकनाथ शिदेंची एका वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले….





