Anil Ambani | उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवर कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) आणि कार्यकारी संचालक अशोक कुमार पाल यांना अटक केली आहे. त्यांना 17,000 कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. विशेष म्हणजे, अशोक कुमार पाल हे अनिल अंबानी यांचे जवळचे सहकारी मानले जातात. हे प्रकरण येस बँक आणि एडीए समूहांतर्गत येणाऱ्या कंपन्यांशी संबंधित कथित आर्थिक गैरप्रकारांशी आहे. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई बनावट बँक कागदपत्रे आणि खोट्या बिलिंगच्या प्रकरणात करण्यात आली आहे. दिल्लीतील ईडी कार्यालयात त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अशोक कुमार पाल यांनी सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SECI) या सरकारी संस्थेला ₹68 कोटींपेक्षा जास्त किमतीची खोटी बँक गॅरंटी कागदपत्रे सादर केली होती. या संपूर्ण प्रकरणात खोट्या चलनांच्या माध्यमातून निधी वळविण्याचा गंभीर आरोप आहे. यासाठी एसबीआय, इंडियन बँक, पीएनबी आणि यूनियन बँक ऑफ इंडिया या प्रमुख बँकांची नावे आणि कागदपत्रे बनावट करून वापरले गेले. इतकेच नाही तर, बनावट ई-मेल डोमेन तयार करून सरकारी कागदपत्रांसारखेच भासविण्याचा प्रयत्न झाला. Anil Ambani | खोटी हमी तयार करण्यात भूमिका घेतली ईडीच्या म्हणण्यानुसार, पाल यांनी अनिल अंबानी यांच्याच एका सहयोगी अधिकाऱ्यामार्फत ही खोटी हमी तयार करण्यात भूमिका बजावली. या प्रक्रियेसाठी बिस्वाल ट्रेडलिंक प्रायव्हेट लिमिटेड (BTPL) नावाच्या कंपनीची निवड करण्यात आली, मात्र त्या कंपनीचा कोणताही अनुभव नव्हता. या सगळ्या घोटाळ्यामागे सरकारी प्रकल्पातील निधी खाजगी फायद्यासाठी वळविण्याचा प्रयत्न झाला असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. BTPL चे संचालक पार्थ सारथी बिस्वाल यांना यापूर्वीच न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. दरम्यान, हे प्रकरण एडीएच्या सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे, ज्यामध्ये येस बँक आणि अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील एडीए समूहांतर्गत येणाऱ्या कंपन्यांशी संबंधित आर्थिक अनियमिततांचा समावेश आहे. ईडीने आरोप केला आहे की, अनिल अंबानी आणि रिलायन्स समूहाच्या संस्था 17,000 कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्यात सामील होत्या. ऑगस्टमध्ये, एजन्सीने सुरू असलेल्या तपासांतर्गत अंबानी यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. Anil Ambani | हेही वाचा: “मी डॉक्टरांना मूर्ख मानतो, एक-दोन जण मेल्यानं काय होतं?”; कबूतरखान्यांच्या मुद्द्यावरून कैवल्य रत्न महाराजांचे विधान