मुंबई – मुंबई पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे एका ड्रग्ज उत्पादन युनिटवर छापा टाकल्यात तब्बल 1,400 कोटी रुपये किमतीचे 700 किलोग्रॅम पेक्षा जास्त मेफेड्रोन जप्त केले. ही राज्यात गेल्या वर्षभरातील सर्वात मोठी कारवाई कारवाई आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने (एएनसी) बुधवारी नालासोपारा (पश्चिम) येथील युनिटवर छापा टाकला. या कारवाईत मुंबईतील अंमली पदार्थ तस्करांना पुरवले जाणारे अमली पदार्थ जप्त करत एका संशयीताला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याच्याकडून एमडी पुरवणाऱ्याची माहिती पोलिसांना मिळाली.
याप्रकरणी अंमलीपदार्थ पुरवठादाराकडून पोलिसांनी 2 किलो 760 ग्रॅम एमडी जप्त केले. त्यानंतर याप्रकरणी 27 जून रोजी आणखी एका महिलेला अटक करण्यात आली. या महिलेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 2 आणि 3 ऑगस्ट रोजी चौथ्या व पाचव्या आरोपीला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.
या प्रकरणातील मुख्य आरोपी हा सेंद्रिय रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवीधर असून त्याला प्रयोगातून मेफेड्रोन तयार करण्याचे सूत्र मिळाले. मुख्य आरोपीशी औषध व्यवसायातील घाऊक विक्रेते मेफेड्रोनसाठी त्याच्याशी संपर्क साधत असत आणि तो 25 किलोपेक्षा कमी प्रमाणात प्रतिबंधित पदार्थ विकत नव्हता. तसेच आरोपी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत करत ड्रग पेडलिंग आणि पुरवठा करण्यासाठी ऍप्सवर कॉल करत होता, अशी माहिती त्याने चौकशीत दिली.
“…म्हणून मला श्वास घेणे कठीण होत आहे”; कोर्टात खासदार संजय राऊत यांचा ईडीवर गंभीर आरोप
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अन्य चार आरोपींपैकी एक महिला आहे. एएनसीच्या पथकाने आरोपींकडून 701.740 किलो मेफेड्रोन जप्त केले असून ज्याची किंमत सुमारे 1,403 कोटी रुपये आहे.गेल्या वर्षभरातील मेफेड्रोनची ही सर्वात मोठी जप्ती असल्याचे अधिका-यांनी सांगितले.
उध्दव ठाकरेंना मोठा दिलासा; “धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत कोणताही निर्णय न घेण्याचा आदेश