Women’s Premier League 2024 : महिला प्रीमियर लीग 2024 दरम्यान दोन स्टार खेळाडूंवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही खेळाडूंनी हंगामातील 15 व्या सामन्यात WPL आचारसंहितेचे उल्लंघन केले होते. हा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. या रोमांचक सामन्यात यूपी वॉरियर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 1 धावेने पराभव केला. ‘या’ खेळाडूंवर मोठी कारवाई… यूपी वॉरियर्सच्या सोफी एक्लेस्टोन आणि किरण नवगिरे यांच्यावर WPL आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या संघाच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान WPL आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला. यामुळे ठोठावला दंड…. शुक्रवारच्या सामन्यादरम्यान WPL आचारसंहितेच्या कलम 2.2 चे उल्लंघन केल्याबद्दल सोफी एक्लेस्टोन आणि किरण नवगिरे यांना दंड ठोठावण्यात आला. महिला प्रीमियर लीग (WPL) च्या विधानानुसार, सोफी आणि किरण दोघांनीही अनुच्छेद 2.2 अंतर्गत लेव्हल 1 भंग मान्य केला आहे, जो सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपड्यांचा किंवा मैदानावरील उपकरणांच्या गैरवापराशी संबंधित आहे. त्यानुसार, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामनाधिकारींचा निर्णय अंतिम आणि वैध असतो. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/deepti-sharma-becomes-the-first-indian-to-take-a-hat-trick-in-wpl/ यूपी वॉरियर्सचा रोमहर्षक विजय.. दिल्ली कॅपिटल्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात यूपीची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जिथे प्रथम फलंदाजी करताना यूपी वॉरियर्सने निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 138 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ 19.5 षटकात 137 धावांवर ऑलआऊट झाला आणि यूपी वॉरियर्सने एक रोमांचक सामना जिंकला.