Bhuvi Comeback Statement : “माझं काय चुकलं? निवड का झाली नाही?” भारतीय संघातून डावलल्यानंतर भुवनेश्वर कुमारने सोडले मौन; पाहा VIDEO
Bhuvi Comeback Statement : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) पॉडकास्टमध्ये बोलताना भुवीने आपल्या मनातील भावना अतिशय प्रांजळपणे व्यक्त केल्या आहेत.

Bhuvneshwar Kumar India Comeback Statement RCB Podcast : भारताचा स्टार स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) २०२२ नंतर भारतीय संघातून बाहेर आहे. आगामी २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठी पूर्व दिग्गज आर. अश्विनसारख्या अनेक खेळाडूंनी त्याच्या पुनरागमनाची वकालत केली आहे. अशातच आता भारतीय संघात पुनरागमन करणे आणि दीर्घकाळ डावलले जाण्यावर भुवनेश्वर कुमारने आपले मौन सोडले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) पॉडकास्टमध्ये बोलताना भुवीने आपल्या मनातील भावना अतिशय प्रांजळपणे व्यक्त केल्या आहेत.
“घरी ‘माझं काय चुकलं?’ यावर चर्चा होत नाही!”
संघातून बाहेर असूनही शांत राहण्याचे श्रेय त्याने कुटुंबाला दिले. भुवी म्हणाला, “आम्ही घरी कधीच क्रिकेटबद्दल बोलत नाही. मी संघात पुनरागमन करणार की नाही, माझी निवड का झाली नाही किंवा ‘माझं काय चुकलं?’ यावर माझ्या घरात कधीच चर्चा होत नाही. या गोष्टीने मला मानसिकदृष्ट्या मजबूत ठेवले असून मला कसलाही पश्चाताप नाही. खेळाडू बदलत राहतात, हा खेळाचाच एक भाग आहे. असा अनुभव घेणारा मी काही पहिला किंवा शेवटचा खेळाडू नाही. मी आज जिथे आहे तिथे खूप आनंदी आहे.”
🗣️ Bhuvi: “𝙀𝙫𝙚𝙣 𝙄 𝙘𝙤𝙪𝙡𝙙𝙣’𝙩 𝙗𝙚𝙡𝙞𝙚𝙫𝙚 𝙩𝙝𝙖𝙩” 😮💨
Bhuvi looks back at that unforgettable finish against MI, the range-hitting sessions he had with DK that gave him the belief to go big, handling pressure in crunch moments, and why the team will always come… pic.twitter.com/KJhWGQDCFo
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) August 2, 2026
आयपीएल २०२५ आणि २०२६ चा स्टार; पण क्रिकेटवरचे प्रेम कायम!
🔴 I DON’T PLAY FOR AN INDIA COMEBACK ANYMORE – BHUVI 🤯
Bhuvneshwar Kumar said🎙️: He has already fulfilled his dream of playing for India, so making a comeback is no longer his main goal.
– He explained that he now plays purely for the love of cricket. However, he remains… pic.twitter.com/4i4ViZ2ee5
— Sam (@cricsam02) August 2, 2026
आयपीएल २०२५ आणि २०२६ च्या हंगामात आरसीबीला (RCB) जेतेपद मिळवून देण्यात भुवनेश्वरने मोलाचा वाटा उचलला होता. पुनरागमनाबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे, त्यामुळे ही आता नव्याने साध्य करायची गोष्ट राहिलेली नाही. जर मला पुन्हा संधी मिळाली तर उत्तमच आहे, पण मी त्या टप्प्यातून पुढे गेलो आहे.”
भुवनेश्वर कुमार पुढे म्हणाला, “मी आता जे काही करतोय, ते फक्त क्रिकेटवरील प्रेमापोटी करत आहे. खेळाशी जोडलेले राहण्यासाठी मी देशांतर्गत क्रिकेट आणि यूपी टी-२० लीग खेळत राहीन.”





