Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरचा मराठमोळा लुक; पैठणी साडीत खास फोटोशूट
Bhumi Pednekar : भूमी पेडणेकरने पैठणी साडीत खास फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने सोशक मीडियावर शेअर केले आहेत.

Bhumi Pednekar : मराठमोळी अभिनेत्री भूमी पेडणेकरने अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
सध्या भूमी तिच्या मराठमोळ्या लुकमुळे चर्चेत आली आहे. भूमीने पैठणी साडीत खास फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भूमीने पैठणी साडी नेसत त्यावर गुलाबी डिझायनर ब्लाऊज घातल्याचं दिसतं आहे. पैठणीमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं आहे. तिच्या ज्वेलरीने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.
गळ्यात तिने चोकर आणि एक मोहनमाळ घातली आहे. तर बन बांधत भूमीने खास हेअरस्टाइल केल्याचं दिसत आहे. Bhumi Pednekar
कपाळावर चंद्रकोर लावत भूमीने तिचा लूक पूर्ण केला आहे. अगदी साध्या मेकअपमध्येही भूमीचं सौंदर्य उठून दिसत आहे. भूमीचा हा मराठमोळा लूक पाहून चाहतेही खूश झाले आहेत.Bhumi Pednekar
एका इव्हेंटसाठी तिने हा खास लूक केला होता. सध्या तिच्या या लुकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. Bhumi Pednekar
हेही वाचा :







