Daldal Web Series : गुन्हेगारी विश्वाची दलदल! भूमी पेडणेकरच्या अभिनयाने वेधले लक्ष
Daldal Web Series : या वेबसिरीजमधून अभिनेत्री भूमी पेडणेकरने दमदार भूमिका साकारून चाहत्यांना विचार करायला भाग पाडले आहे.

Daldal Web Series : अमेझॉन प्राइमवर दलदल नावाची नवीन वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. पुन्हा एकदा धाडसी भूमिकेत अभिनेत्री भूमी पेडणेकर परतली आहे. तिने या सिरीजमध्ये रीता फरेरा या महिला पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारलेली आहे. खरंतर ही भूमिका आव्हानात्मक असून देखील तितक्याच बखुबीने भूमीने या भूमिकेला न्याय दिला आहे. या सिरीजमधील पात्रामुळे भूमी सध्या चर्चेत आहे.
दलदल वेबसिरीजची कथा गुन्हेगारी विश्वाचा ठाव घेणारी आहे. ही एक प्रकारची दलदल असून अनेक जण या दलदलीत अकडून पडलेले आहेत. वरकरणी कथानकात नेमकं काय घडतयं हे सुरुवातीचे काही भाग पाहिल्यानंतर समजत नसले तरी हळूहळू ते समजत जाते. अमृत राज यांनी दिग्दर्शित केलेल्या दलदल सिरीजची कथा जरा वेगळ्या धाटणची आहे.
गुन्हेगारी विश्वासोबतच मानसिक समस्येवर देखील प्रकाश टाकण्याचे काम सिरीजने केले आहे. सात भागांच्या वेबसिरीजमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी रीता फरेरा (भूमी पेडणेकर) समोर आणले जाते. तिची पोलीस उपायुक्त (डीसीपी) म्हणून बढती केली जाते. त्यानंतर पुढे घडणारे कथानक अंगावर काटा आणणारे आहे. या सिरीजमध्ये काही मराठी कलाकार देखील आहेत.
अनिता आचार्य या पत्रकार तरुणीची भूमिका साकारणारी समारा तिजोरी हिने देखील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आदित्य राऊत, अनंत महादेवन, गीता अग्रवाल शर्मा आणि इतर कलाकारांचा देखील तितकाच उत्कृष्ट अभिनय आहे. सिरीजमधील प्रत्येक शॉट आणि प्रत्येक फ्रेम विचार करायला लावणारी आहे.
हेही वाचा : Mirzapur: The Movie : आता मिर्जापूर मोठ्या पडद्यावर! पोस्टर अन् रिलीज डेट समोर





