Bhosari Crime | भोसरीत भरदिवसा हल्ला! पत्नीसमोरच पतीला मारहाण ; पोलिसांत गुन्हा दाखल

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – जुन्या वादाच्या कारणावरून तरुणाला दगडाने मारहाण केली. तसेच त्याच्या पत्नीलाही शिवीगाळ करीत धमकी दिली. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास लांडेवाडी भोसरी येथे घडली.निलेश धोत्रे, विकी उर्फ मानतू जाधव, सुरज गायकवाड, साहिल ठोके, लक्ष्मण नागोले (सर्व रा. शांतीनगर, भोसरी, पुणे) व त्यांचे दोन साथीदार (नाव, पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची माहिती आहे. निखिल नामदेव कसबे (वय २५, रा. राजवीर रेसिडेन्सी, दिघी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास लांडेवाडी, भोसरी येथे फिर्यादी पत्नीसमवेत आले होते. त्यावेळी आरोपींनी जुन्या वादातून व मोबाइलचे पैसे न दिल्याच्या कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपींनी दगड फेकून फिर्यादीच्या डोक्याला दुखापत केली. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादीची पत्नीलाही शिवीगाळ करीत धमकी दिली. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
—


