भोर, (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील १७ गांवाचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असून व्यापारी पद्धतीने शेती करणे गरजेचे आहे. १७ गावांना जवळपास १८ किलोमीटर बंदिस्त नलिकेद्वारे नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारमाही पाणी मिळणार आहे. त्यामुळे १११८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने खऱ्या अर्थाने माजी मंत्री अनंतराव थोपटे व ग्रामस्थांनी पाहिलेले स्वप्न मूर्त स्वरूप घेत असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी भूमिपूजनप्रसंगी केले. महुडे खुर्द (ता. भोर) येथे २८ कोटी ४७ लक्ष ५८ हजार रुपये निधीच्या नीरा देवघर डावा कालवा वितरण व्यवस्थेचे भूमिपूजन आमदार थोपटे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी भोर तालुका काँग्रेसच्या सरचिटणीसपदी रामचंद्र कुमकर, युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी विनायक पवार, प्रशांत दामगुडे, सरचिटणीसपदी शंकर दामगुडे, ओ.बी.सी.सेलच्या उपाध्यक्षपदी सूर्यकांत आखाडे, सोशल मिडिया सेलच्या उपाध्यक्षपदी अक्षय खोपडे यांची निवड करण्यात आली या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, माजी सभापती बाळासाहेब थोपटे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, भोर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गितांजली शेटे, भोर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितीन दामगुडे, निरा देवघर डावा कालवा समितीचे अध्यक्ष बबन खाटपे, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अतुल किंद्रे, व्हा.चेअरमन अतुल शेडगे, संचालक सुरेश राजीवडे, दीपक गायकवाड, नथु दामगुडे, संजय मळेकर, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अंकुश खंडाळे, संचालक विनोद खुटवड, सरपंच सोनाली कुमकर, उपसरपंच सचिन कुमकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.