‘भूल भूलैय्या ३’ आणि ‘सिंघम अगेन’ला प्रदर्शनापूर्वीच धक्का; ‘या’ देशात घातली बंदी

Singham Again And Bhool Bhulaiyya 3 | दिवाळीच्या मुहूर्तावर ‘भूल भूलैय्या ३’ आणि ‘सिंघम अगेन’ हे दोन चित्रपट एकमेकांना टक्कर देणार आहे. 1 नोव्हेंबर रोजी जगभरातील थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी हे दोन्ही चित्रपट सज्ज झाले आहे. मात्र चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच या सिनेमांना मोठा धक्का बसला आहे.
रिपोर्ट्सनुसार, सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 चित्रपट सौदी अरेबियामध्ये प्रदर्शित होणार नाहीत. ‘भूल भूलैय्या ३’ सिनेमात कार्तिक आर्यन साकारत असलेल्या भूमिकेत समलैंगिकतेचा उल्लेख आहे. तर ‘सिंघम अगेन’ सिनेमात हिंदू-मुस्लिम तणावाची झलक बघायला मिळते. या विषयांच्या पार्श्वभूमीवर ‘भूल भूलैय्या ३’ आणि ‘सिंघम अगेन’ या सिनेमांना सौदी अरबमध्ये बंदी घालण्यात आली. त्यामुळे रिलीजआधीच या दोन सिनेमांना मोठा फटका बसणार आहे.
रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटात मोठ्या स्टार कास्ट आहेत. चित्रपटाततील भावना आणि ॲक्शन यांचा संगम सर्व वयोगटातील लोकांना आवडेल, असा हा चित्रपट आहे. यामध्ये रोहितच्या पोलिस विश्वातील बाजीराव सिंघम, सूर्यवंशी आणि सिम्बा ही आयकॉनिक पात्रे पुन्हा दाखवण्यात आली आहेत. यात अजय देवगण, करीना कपूर, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्या भूमिका आहेत.
याशिवाय कार्तिक आर्यनच्या भूल भूलैय्या ३ मध्ये कार्तिकसोबत विद्या बालन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. अक्षय कुमारच्या 2007 मध्ये आलेल्या भूल भुलैया चित्रपटाचा हा तिसरा भाग आहे, ज्याच्या दुसऱ्या भागात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसला आहे. आता तो ‘भूल भुलैया 3’ मध्येही दिसणार आहे, ज्याचे दिग्दर्शन अनीस बज्मी यांनी केले आहे. हे दोन्ही चित्रपट उद्या 1 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहेत.
हेही वाचा:





