रोहित शेट्टीने सलमान खानच्या चाहत्यांना दिले सरप्राइज

Mission Chulbul Singham | दिग्दर्शक रोहित शेट्टीचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात चुलबुल पांडेनेही एन्ट्री घेतली आहे. सिंघम अगेनमध्ये सलमान खानने कॅमिओ करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. आता रोहित शेट्टीने सलमानच्या चाहत्यांना सरप्राइज दिले आहे.
रोहित शेट्टीने सलमान खानसोबतच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. रोहित शेट्टीच्या सिंघम फ्रेंचायझीच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार आहे. ‘मिशन चुलबुल सिंघम’ची घोषणा करण्यात आली आहे. रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटाच्या शेवटी सलमान खानच्या नव्या चित्रपटाचे संकेत दिले आहेत.
सलमान खान आता रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा एक भाग असणार आहे. सलमान खान ‘दबंग’मधील पोलिस ‘चुलबुल पांडे’ची भूमिका पुन्हा एकदा साकारताना दिसणार आहे. सिंघम अगेनच्या पोस्ट-क्रेडिट सीनमध्ये, चुलबुल पांडेच्या भूमिकेत सलमान खान एन्ट्री करतो आणि अजय देवगणच्या सिंघममध्ये सामील होतो. यावेळी स्क्रिनवर कॉप युनिव्हर्सच्या’मिशन चुलबुल सिंघम’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.





