अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Singham Again Song | अभिनेता अजय देवगण स्टारर चित्रपट ‘सिंघम अगेन’च्या निर्मात्यांनी ‘जय बजरंगबली’ हे पहिले गाणे रिलीज केले आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, यातच या चित्रपटातील गाण्याला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच त्याला अवघ्या 24 तासांत 198 मिलियनहून अधिक व्हूज मिळाले होते. त्यात सिनेमातील नव्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातले आहे. ‘सिंघम अगेन’ मधील गाण्यामध्ये अजय देवगन आणि रणवीर सिंग सीतेच्या शोधात म्हणजेच करीना कपूरला शोधण्यासाठी बाहेर पडतात. सारेगमप म्यूझिकच्या यूट्यूब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित केले आहे. Singham Again Song |
सुधांशू, रितेश जी राव, सात्विक जी राव, पृथ्वी चंद्रा, लक्ष्मी नायडू, श्रुती रंजनी, प्रणती, ऐश्वर्या दारुरी, साहित्य चगंटी, मनीषा पांडरंकी, श्रुतिका, लक्ष्मी मेघना, नादप्रिया या गायकांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. हे गाणे थमन एस यांनी संगीतबद्ध केले होते. तर गीत स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहेत. Singham Again Song |
‘सिंघम अगेन’चा ट्रेलर 7 ऑक्टोबर रोजी रिलीज झाला, जिथे त्याच्या विलक्षण कथेची झलक पाहायला मिळाली. हा चित्रपट 1 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिंघम अगेनबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. Singham Again Song |
हेही वाचा:
राजस्थान | ढोलपूरमध्ये भीषण अपघात, बस टेम्पोला धडकली; 8 मुलांसह 11 जणांचा ‘मृत्यू’





