Singham Again OTT Release | बॉलीवूड अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम अगेन’ चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाल दाखवण्यास अपयशी ठरला. कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 3’ सोबत या चित्रपटाची टक्कर होणे हे सिंघम अगेनला महागात पडले. चाहते आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिंघम अगेनच्या रिलीजची वाट पाहत आहेत. लवकरच हा सिनेमा ओटीटीवर येण्यास सज्ज होणार आहे. सिंघम अगेनच्या हा चित्रपट 27 डिसेंबरला प्राइम व्हिडिओवर रिलीज होऊ शकतो. मात्र, निर्मात्यांनी अद्याप रिलीजबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे चाहत्यांनाही यासाठी काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. सिंघम अगेनच्या कथेबद्दल सांगायचे तर, त्यात आधुनिक रामायण दाखवण्यात आले आहे. अर्जुन कपूरने करीना कपूरचे अपहरण केल्यानंतर अजय देवगण त्याच्या संपूर्ण टीमसोबत तिला वाचवण्यासाठी जातो. हे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट ॲक्शन आणि कॉमेडीने परिपूर्ण आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे तर, अजय देवगणसोबत अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण, करीना कपूर, रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीनं केलं आहे. 1 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या सिंघम अगेन आणि कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया 3 सोबत टक्कर झाली. पण, भूल भुलैया 3 सुपरहिट ठरला. Singham Again OTT Release | हेही वाचा: “डोके दुखी, ताप आणि डोळ्यांतून येतंय रक्त” ; ‘या’ भयानक आजारामुळे 17 देशांमध्ये अलर्ट जारी, आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू