Bhigwan Kidnapping Case : भिगवण अपहरण प्रकरणात मोठा खुलासा! मध्यरात्री तरुणी पोलीस ठाण्यात हजर; धक्कादायक सत्य आलं समोर
Bhigwan Kidnapping Case : आईची फिर्याद विरुद्ध मुलीचे प्रतिज्ञापत्र; न्यायालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी, तणावाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त.

Bhigwan Kidnapping Case – इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे भरदिवसा झालेल्या कथित अपहरण प्रकरणाने गेल्या काही दिवसांत संपूर्ण परिसर ढवळून निघाला होता. मात्र या प्रकरणाला अनपेक्षित वळण देत संबंधित २१ वर्षीय तरुणीने २१ फेब्रुवारीच्या मध्यरात्री सुमारे दीड वाजता थेट बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर होत स्वतःची बाजू मांडली.
दरम्यान मी दबावाखाली नव्हते, अशा स्वरूपाचा जबाब तिने पोलिसांसमोर नोंदवला. त्यांना कोर्टासमोर हजर केले. कोर्टात देखील जबाब नोंदविण्यात आले. पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते म्हणाले की, भिगवण पोलीस ठाण्याअंतर्ग गुन्ह्यातील दोघे रात्री शहर पोलीस ठाण्यात आले. गुन्ह्याच्या तपासात जबाब घेण्यात आला आहे.
नमूद मुलीचा न्यायालयासमोर जबाब नोंदविला आहे. पुढील गुन्ह्याचा तपास सध्या सुरु आहे. तिच्या आई आणि भावाने इथे त्यांचे मत मांडले आहे. त्या तरुणीने तिचे मत त्यांच्यासमोर मांडले आहे. ते आपसात मत वेगळे आहे. यापूर्वी तरुणीने व्हीडीओद्वारे मी स्वत:हून गेल्याचे सांगितले होते. तिचे तेच मत आहे. दोन्ही बाजुंचा पोलिसांकडून बारकाइने तपास सुरु आहे.
तिने आई आणि भावाकडे जाण्यास नकार दिला आहे. तिला तिचे मत विचारण्यात येईल. महिला गृहात ठेवण्याचा पर्याय आहे. मुलीच्या आईचे संभाषण झाले आहे. समक्ष जबाब सुरु आहे. त्यानंतर पोलीस कारवाई करतील. फिर्यादी आई आणि पीडित मुलगी दोघींचे ‘स्टेटमेंट’ वेगळे आहे.
पुढील तपासात उर्वरीत जाबजबाब नोंदविणे, पुरावे तपासण्याचे काम करणार आहे.दरम्यान, तरुणीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालय परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी तरुणीचे नातेवाईक देखील उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
प्रतिज्ञापत्रात तरुणीने काय म्हटलयं?
माझं आणि त्याचे प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होतं. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेले. मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा असल्याचे तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितले आहे.
मी स्वतः माझ्या राजीखुषीने व मर्जीने १ वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने निघून गेली होती. मी पूर्णपणे सज्ञान असल्याने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असेही तिने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.





