BMW ची 50 लाखांची इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, एकदा चार्ज केल्यावर 500KM धावणार

BMW iX1 LWB EV Launched: सध्या नवीन दिल्ली आणि ग्रेटर नोएडा येथे Bharat Mobility Expo 2025 सुरू आहे. या एक्स्पोमध्ये अनेक नवनवीन गाड्या लाँच केल्या जात आहेत. BMW इंडियाने देखील या एक्स्पोमध्ये त्यांची All Electric iX1 LWB लग्झरी कार लाँच केली आहे. 50 लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या कारमध्ये शानदार इंटेरियर, डिझाइन आणि फीचर्स देण्यात आले आहेत. BMW iX1 LWB EV कारविषयी सविस्तर जाणून घेऊया.
BMW iX1 LWB EV चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
BMW ने iX1 LWB EV ला 66.4kWh बॅटरी पॅकसह लाँच केले असून, याची रेंज 531 किमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. 204hp, 250Nm फ्रंट एक्सल-माउंटेड मोटरच्या मदतीने कार अवघ्या 8.6 सेंकदामध्ये 0 ते 100kph चा वेग पकडू शकते. कंपनीचा दावा आहे की, बॅटरीला DC फास्ट चार्जरच्या मदतीने 130kW ने चार्ज करता येईल.
BMW iX1 LWB EV मध्ये फ्रंट आणि रियरला एग्रेसिव्ह डिझाइन देण्यात आले आहे. सोबतच, 18 इंचाचे एम एलॉय व्हील यात मिळतील. या लग्झरी कारमध्ये फ्रंटला स्लिम अॅडेप्टिव LED हेडलाइट्स, ग्रिलसाठी मेश पॅटर्न आणि 3D LED टेल-लाइट्स देण्यात आले आहेत. कारमध्ये ‘वाइडस्क्रीन कर्व्ड डिस्प्ले’ देण्यात आला आहे. यात 10.25-इंच इंस्ट्रूमेंट डिस्प्ले आणि 10.7-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन देण्यात मिळेल.
कारच्या इतर फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये पॅनोरमिक सनरूफ, ड्यूअल-झोन क्लाइमेट कंट्रोल, 205W 12-स्पीकर हर्मन कार्डन सिस्टम आणि वेंगांजा लेदरेट अपहोल्स्ट्री देण्यात आली आहे. सुरक्षा फीचर्समध्ये लेव्हल 2 ADAS, एक पार्क असिस्ट फीचर, 8 एयरबॅग्स, ISOFIX अँकर आणि एक इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देण्यात आला आहे.
BMW iX1 LWB EV च्या eDrive20L M स्पोर्ट मॉडेलची किंमत 49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. या लग्झरी कारला ग्राहक मिनरल व्हाइट, स्काईस्क्रेपर ग्रे, एम कार्बन ब्लॅक, एम पोर्टिमाओ ब्लू आणि स्पार्कलिंग कॉपर ग्रे या रंगात खरेदी करू शकतात.





