‘मुलगा असूनही बाप झालास’; प्रसाद ओकला लेकाने गिफ्ट केली आलिशान कार

Prasad Oak New Car | अभिनेता प्रसाद ओकच्या मुलाने त्याला एक आलिशान कार गिफ्ट केली आहे. प्रसादने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अभिनेता प्रसाद ओकच्या मुलाने स्वतःच्या वाढदिवसादिवशी आपल्या वडिलांना हे गिफ्ट दिले आहे.
प्रसाद ओकला मयंक आणि सार्थक अशी दोन मुलं आहेत. अभिनेत्याला सार्थकने गिफ्ट म्हणून खास BMW कार दिली आहे. यानंतर प्रसाद ओकने पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘सार्थक… मुलगा असूनही “बाप” झालास. अत्यंत अभिमान वाटतो तुझा…!!! देव कायम तुझ्या पाठीशी राहो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना…!!! तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन लेकाचे आभार मानले आहे.
दोघांच्याही पोस्टवर कलाकारांकडून आणि चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. नवीन गाडी घेतल्यानंतर प्रसादची पत्नी मंजिरी ओकने खास पोस्ट शेअर करत आपल्या दोन्ही मुलांचं कौतुक केलं आहे. या पोस्टबरोबर २२ वर्षांआधीचा फोटो शेअर करत तिने जुन्या आठवणीला उजाळा दिला आहे.
View this post on Instagram
मंजिरी ओकची पोस्ट
‘सार्थक जेव्हा गोष्ट तुमच्या बाबतीतली यायची… तेव्हा आपला बाबा तसा थोडा भित्राच होता ( अजूनही आहे ). तुझ्या दुसऱ्या वाढदिवसाला ( म्हणजे ३ सप्टेंबर २००२ ) जरा मी मागे लागले म्हणून बाबाची तयारी नसताना त्यानी तुला ही सायकल सरप्राइज गिफ्ट म्हणून आणली होती पण त्याला काळजी की, तू ती चालवताना पडलास तर? तुला लागलं तर ? म्हणून कित्येक दिवस त्याने तुला ती सायकल घराखाली नेऊ पण दिली नाही. (अर्थात आपण हळूच जायचो तो नसताना ) त्यावर बसायचं कसं हे पण तुला कळत नव्हतं.
View this post on Instagram
मात्र, तू बाबाला ती पहिल्यांदा चालवून दाखवल्या नंतरचा जो आनंद तुझ्या चेहऱ्यावर होता अगदी तोच आणि तसाच आनंद ( लहान मुलासारखा ) आज बाबाच्या चेहऱ्यावर आहे. त्याचं कारण म्हणजे, आज २२ वर्षांनी ( ३ सप्टेंबर २०२४ ) तू बाबाला ही मोठ्ठी गाडी सरप्राइज गिफ्ट दिलीस… मी नको म्हणाले, तर तू म्हणालास की बाबा स्वतःहून कधीच स्वतःसाठी मोठी गाडी घेणार नाही. (त्या ऐवजी छोटं घर घेऊ असंच म्हणेल). माझ्याकडे शब्द नाहीयेत सार्थक… फक्त एवढच सांगते की खूप खूप अभिमान वाटतो तुझा आणि मयंकचा पण…!!! खूप मोठा हो, स्वामी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा“B”est “M”any “W”ishes’, अशी पोस्ट मंजिरी ओकने शेअर केली आहे.
दरम्यान, प्रसाद लोक लवकरच ‘धर्मवीर २’ चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट येत्या २७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता आहे.
हेही वाचा:
एनडीएत अजित पवारांचे दबावाचे राजकारण? ; राष्ट्रवादीच्या बैठकीत ‘इतक्या’ जागांच्या मागणीवर चर्चा





