पालकमंत्री पद न मिळाल्याने भरत गोगावले नाराज? म्हणाले “हे अनपेक्षित, पण…”

Bharat Gogavale | मागील काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर काल शनिवारी रात्री पालकमंत्री पदाची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहेत.
तर, अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासोबतच पुण्याचीही जबाबदारी देण्यात आली आहे. तर मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांना मात्र पालकमंत्री पदाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. याप्रकरणी काही मंत्र्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर मंत्री अदित्य तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. यामुळे मंत्री भरत गोगावले नाराज असल्याची चर्चा आहे. भरत गोगावले यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी राडा केला होता. शनिवारी रात्री गोगावले समर्थकांनी काही काळासाठी आंदोलन करत मुंबई-गोवा महामार्ग रोखला.
भरत गोगावले काय म्हणाले?
यानंतर आता मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कळवलं होतं. सर्वांना भेटी घेऊन सांगितलं. त्यानंतर जिल्ह्यातही वातावरण झालं होतं की पालकमंत्री भरत गोगावले झाले पाहिजे. आता जो निकाल आला तो अनपेक्षित आहे. पण ठीक आहे. आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य करावा लागेल,” गोगावलेंनी म्हंटले आहे. Bharat Gogavale |
भरत गोगावलेंच्या समर्थकांचा जोरदार राडा
पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं. त्यामुळे रायगडमधील शिवसैनिक संतप्त झालेत. मुंबई गोवा महामार्गावर महाड जवळ रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून याचा निषेध केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करीत शिवसैनिकांना बाजूला केलं आणि वाहतूक सुरळीत केली. Bharat Gogavale |
हेही वाचा:





