‘आता थांबायचं नाय’ चित्रपटात पुन्हा एकदा दिसणार भरत आणि सिद्धार्थ जाधवची जोडी

Ata Thambaycha Naay Marathi Movie | अभिनेता भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘आता थांबायचं नाय’ असे या चित्रपटाचे नाव आहे. शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमगर, किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे आणि आशुतोष गोवारीकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक ‘झी गौरव पुरस्कार’ सोहळ्यात लाँच करण्यात आला. एकंदरच पहिली झलक पाहाता हा चित्रपट शिक्षणावर आधारित असल्याचे दिसते.
तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर, निधी हिरानंदानी आणि धरम वालिया निर्माते आहेत. चित्रपटाबद्दल दिग्दर्शक शिवराज वायचळ म्हणातात, ”हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून आयुष्यातील संघर्ष आणि पुढील वाटचालीसाठी एक प्रेरणादायी संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. या प्रवासात आम्हाला झी स्टुडिओजची साथ लाभली. त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हते आणि यासाठी मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो.” Ata Thambaycha Naay Marathi Movie |
झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर उमेश कुमार बन्सल म्हणतात, ”आजवर झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना वैविध्यपूर्ण चित्रपट दिले आहेत. ‘आता थांबायचं नाय’ हा देखील असाच चित्रपट आहे. ‘आता थांबायचं नाय’ हा चित्रपट केवळ एक मनोरंजक अनुभव नाही तर तो जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची शिकवण देणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे.”
दरम्यान, या चित्रपटाची कथा सत्यकथेवर आधारित असून, ती एक प्रेरणादायक आणि सकारात्मक ऊर्जा देणारी आहे. याची लेखनाची जबाबदारी शिवराज वायचळ, ओमकार गोखले आणि अरविंद जगताप यांच्यावर आहे. हा चित्रपट १ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा:
हसता हसता लोटपोट होण्यासाठी तयार राहा! ‘चिकी चिकी बुबूम बुम’चा मजेशीर ट्रेलर रिलीज





