हसता हसता लोटपोट होण्यासाठी तयार राहा! ‘चिकी चिकी बुबूम बुम’चा मजेशीर ट्रेलर रिलीज

Chiki Chiki BooBoom Boom Movie | स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी अशा लोकप्रिय कलाकारांची प्रमुख भूमिका असलेला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या हटके पोस्टर व टीझरने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. आता या सिनेमाचा मजेशीर ट्रेलर समोर आला आहे.
या चित्रपटाचे शीर्षक समोर आल्यापासून याची जोरदार चर्चा रंगली होती. आता चित्रपटाचा मजेशीर ट्रेलर समोर आला आहे. ‘पोट दुखेल, पण मजा थांबणार नाही. हसता हसता लोटपोट होण्यासाठी तयार राहा’, अशा मजेशीर कॅप्शनसह हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.
शाळा-कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी अनेक वर्षांनी पुन्हा भेटतात. मित्र-मैत्रिणी रियुनियनला भेटल्यावर कशी धमाल मस्ती करतात व त्यानंतर काय काय घडते, हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. हा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे.
View this post on Instagram
प्रसाद खांडेकर यांचे दिग्दर्शन असलेला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ हा चित्रपट 28 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे, प्राजक्ता माळी, प्रसाद महादेव खांडेकर, रोहित माने, प्रथमेश शिवलकर, प्रभाकर मोरे हे प्रमुख कलाकार प्रेक्षकांना हसवताना पाहायला मिळतील.
याशिवाय, नम्रता संभेराव,वनिता खरात, सचिन गोस्वामी, ओंकार राऊत, प्रियदर्शनी इंदलकर, अभिजीत चव्हाण, निखिल रत्नपारखी, चेतना भट, निखिल बने, श्याम राजपूत, श्लोक खांडेकर, प्रमोद बनसोडे, ऐश्वर्या बडदे या कलाकारांचीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.
चित्रपटाचे लेखन प्रथमेश शिवलकर, प्रसाद महादेव खांडेकर यांनी केले आहे. तर नारकर फिल्म्स अँड एंटरटेनमेंटद्वारे निर्मिती करण्यात आली आहे.





