अखेर ‘भामा-आसखेड’चे पाणी धानोरीत दाखल; स्थानिकांच्या हस्ते ‘जलपूजन’

Updated On:

विश्रांतवाडी – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भामाआसखेड पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला. मुख्य वाहिन्यांचे पाच ते सहा वेळा वॉशआऊट करून अखेर शनिवारी (दि.९) पाणी धानोरीतील टाक्यांपर्यंत पोहोचले. या पाण्याचे नगरसेवक अनिल(बॉबी) टिंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक ज्येष्ठ महिलांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

या योजनेमुळे धानोरीसह वडगावशेरी मतदारसंघातील विविध परिसरातील नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. यापुढे पाण्याचा सुरळीत व मुबलक पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

जलपूजनप्रसंगी नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे, भामा आसखेड प्रकल्पाचे उपअभियंता राजेश भूतकर, विजय हवालदार, मधुकर थोरात, कनिष्ठ अभियंता अजय मोरे, सुहास महेंद्रकर तसेच शांताबाई परांडे, सविता परांडे, माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रियांका परांडे, रानुबाई परांडे, सुजाता कानसकर, शंकर टिंगरे, नीळकंठ गाढवे, महेश सगरे, काशिनाथ जाधव, सिद्धार्थ तरकसे, दिनेश साळुंके, संतोष जानकर, सौरभ मोरे, रवी गारे व ग्रामस्थ उपस्थित होते.

या योजनेचे काम पूर्ण होण्यासाठी अनेक जणांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. शनिवारी ( दि.९) मुख्य वाहिन्यांचे अखेरचे वॉशआऊट करून क्लोरीन टेस्टिंगही करण्यात आले. आगामी दोन दिवसात धानोरीतील २५लाख, २०लाख व १०लाख लिटर क्षमतेच्या तीनही टाक्या व मुंजाबावस्तीतील २०लाख लिटर क्षमतेच्या टाकीतून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे धानोरी गावठाणासह मुंजाबावस्ती, सिध्दार्थनगर, भैरवनगर, आनंदपार्क, माधवनगर, गोकुळनगर, श्रमिकनगर परिसरातील नागरिकांना मुबलक व सुरळीत पाणीपुरवठा होणार असल्याचे नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे म्हणाले.

दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान – अनिल उर्फ बॉबी टिंगरे
२०१२ साली निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन प्रभागातील नागरिकांना दिले होते. त्या पार्श्वभूमीवर भामाआसखेड योजनेचे पाणी प्रभागाला मिळावे याकरिता पाठपुरावा केला.२०१७च्या निवडणुकीपूर्वी प्रभागात चार पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण केले.

त्यानंतर जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सत्ताधारी भाजपाचा नगरसेवक असताना देखील पाणीप्रश्नाबाबत पालिका सभागृहात आवाज उठवत अनेकवेळा वडगावशेरी मतदारसंघातील नगरसेवकांसमवेत आंदोलनेही केली. पंपिंग स्टेशनवर नागरिकांसमवेत आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरले.

शेवटपर्यंत जनतेचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी मनापासून केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. यासाठी पक्षनेतृत्वाने देखील वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले. यामुळेच जनतेला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याचे भाग्य लाभल्याने मनोमन समाधान वाटत असल्याचे नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे म्हणाले.

आणखी संबंधित बातम्या

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

2026-10-07 12:41:42

Rohini Khadse And Chitra Wagh : 'काळ्याकुट्ट भुवया घेऊन...' रोहिणी खडसेंच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान