रेड चिलीजचा ‘भक्षक’ चर्चेत ! भूमी पेडणेकर दिसणार पत्रकाराच्या भूमिकेत..

Bhumi Pednekar Bhakshak : भूमी पेडणेकर तिच्या आगामी ‘भक्षक’ प्रोजेक्टमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. खऱ्या घटनांपासून प्रेरित असलेला हा आगामी क्राईम ड्रामा नेटफ्लिक्स इंडियावर प्रसारित होईल. गौरी खान आणि गौरव वर्मा निर्मित हे रेड चिलीज एंटरटेनमेंट सादरीकरण आहे. पुलकितने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. भूमी व्यतिरिक्त या चित्रपटात संजय मिश्रा, आदित्य श्रीवास्तव आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहेत. निर्मात्यांनी गुरुवारी या चित्रपटाचा टीझर रिलीज केला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सत्य घटनांनी प्रेरित, Netflix इंडियाचा आगामी क्राईम ड्रामा ‘भक्षक’ 9 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. भक्षक ही एका महिलेची कथा आहे, जी न्यायासाठी लढत असते. वैशाली सिंगच्या रोलमधील भूमी पेडणेकर एका शोध पत्रकाराची भूमिका साकारत आहे जिला महिलांवरील गुन्ह्यांचे वास्तव समोर आणून एक भयंकर गुन्हा उघडकीस आणायचा आहे. यापूर्वी भूमी ‘थँक यू फॉर कमिंग’मध्ये हलक्या फुलक्या रोलमध्ये दिसली होती.
हलक्या फुलक्या रोलनंतर आता भूमी थेट क्राईम आणि सिरिअस अशा पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. चॅलेंजिंग असलेल्या या रोलमध्ये भूमी शोध पत्रकार म्हणून काहीतरी विलक्षण समोर आणणार असल्याचे समजते. समाजातील कठोर वास्तवांवर प्रकाश टाकणे आणि अर्थपूर्ण बदल घडवून आणणाऱ्याना प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश असलयाचे दिग्दर्शक पुलकितने या प्रोजेक्टविषयी भाष्य करताना म्हंटले.
शाहरुख खानच्या मालकीच्या प्रॉडक्शन हाऊस रेड चिलीज एंटरटेनमेंटने सुपरस्टारचे शेवटचे दोन जागतिक ब्लॉकबस्टर, अॅटलीचा क्राइम थ्रिलर ‘जवान’ आणि राजकुमार हिरानीचा ‘डिंकी’ तयार केला आहे. ‘भक्षक’ हा या बॅनरचा डिजिटल रिलीज आहे.या आधी त्यांनी ‘डार्लिंग्स’ची ओटीटीवर निर्मिती केली होती.गेल्या काही महिन्यांपासून भक्षकची देखील इंडस्ट्रीमध्ये मोठी चर्चा सुरु असलयाचे पाहायला मिळाले.





