डोर्लेवाडी – डोर्लेवाडीत (बारामती) माजी केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ४० किलो वजनी गटातील कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. मेखळी येथील भैरवनाथ क्रीडा या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. डोर्लेवाडी येथील ईगल स्पोर्ट क्लब संघाच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल वाबळे, खरेदी विक्री संघाचे संचालक ज्ञानदेव नाळे, माजी संचालक भगवान क्षीरसागर, तंटामुक्त अध्यक्ष काकासाहेब शिंदे जितेंद्र काटे, नानजी बाबर, दादासाहेब दराडे, रामभाऊ कालगावकर, अविनाश काळकुटे, विनोद नवले, मिलिंद घोरपडे, ईगल स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष बापूराव गवळी, उपाध्यक्ष हनुमंत मदने आदी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
द्वितीय क्रमांक ईगल स्पोर्ट क्लब डोर्लेवाडी, तृतीय क्रमांक सोनेश्वर क्रीडा मंडळ सोनगाव व चतुर्थ क्रमांक राणाप्रताप क्रीडा मंडळ झारगडवाडी या संघाने मिळविला. उत्कृष्ट चढाई प्रतिक साळे, उत्कृष्ट पकड ओम चव्हाण व कृष्णा गाडेकर यांस सामन्याचा मानकरी म्हणून पुरस्कार मिळाला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देण्यात आले. बापू साळे, आदित्य गोरे, नाना काळकुटे, गणेश मदने, नितीन जाधव पंच म्हणून काम पाहिले. अमोल जाधव, बापू जाधव, सचिन लोणकर यांनी स्पर्धेचे नियोजन केले. जिल्ह्यातील ३४ संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.