pune gramin : बारामतीतील डोर्लेवाडी मध्ये दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी
Updated On:

डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी गावामध्ये अनेक वर्षापासून दोन नेवसे कुटुंबामध्ये वादावादी आहे. या दोन कुटुंबामध्ये डोर्लेवाडी ग्रामपंचायत समोरील जागेवरील बांधलेल्या गाळ्यावरून वाद सुरू आहे.
याबाबत कोर्ट मॅटर देखील चालू आहे, असे असताना आज सायंकाळी सातच्या सुमारास दोन्ही नेवसे कुटुंबामध्ये तुफान हाणामारी झाली आहे यात चार चाकी गाडी देखील फोडण्यात आली आहे. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील व्यक्ती जखमी झाले आहेत. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
अचानक झालेल्या या हाणामारीमुळे मात्र डोर्लेवाडी गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बारामती शहर पोलिस घटनस्थळी दाखल झाले असून अधिक तपास करीत आहेत.





