सत्तासंघर्षाच्या निकालावर भगतसिंह कोश्यारींची पहिली प्रतिक्रिया; केलं ‘हे’ मोठं विधान…

मुंबई – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल अखेर आज आला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी या निकालाचे वाचन सुरु केले. यावेळी नवाब रेबिया प्रकरण सात बेंचकडे पाठवले. यासोबत कोर्टाने राज्यपालाच्या कामावर देखील ताशेरे ओढले. राज्यपालांचे निर्णय चुकीचे आहेत, त्यांनी जे पाहिलंच नव्हतं त्या आधारे तत्कालीन राज्यपालांनी निर्णय दिला असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं.
महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होताना राज्यपालांनी त्यांच्या विवेकाचा वापर हा घटनेनुसार केला नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं आहे. पक्षांतर्गत वादात राज्यपालांनी भूमिका बजावणं चुकीचं असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे.
#WATCH | Former Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari reacts on Supreme Court verdict on Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Supreme Court has said that the then Maharashtra Governor had acted against the law. pic.twitter.com/EgaT8yDrWY
— ANI (@ANI) May 11, 2023
यासंदर्भात आता विरोधी पक्षांनी टीका करायला सुरुवात केली असताना खुद्द भगतसिंग कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील सोशल मिडियावर पोस्ट करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर आपण टिप्पणी करू शकत नाही, बहुमत चाचणीचा निर्णय तेव्हा चुकीचा होता. आता त्याच्याशी काय करायचंय? यासंदर्भात न्यायालयानं सगळं सांगितलं आहे. न्यायालयाच्या निकालापुढे मला काहीही बोलायचं नाही. असं मत खुद्द भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे.





