Best Camera Smartphones: 200MP कॅमेऱ्यासह येणारे टॉप-5 स्मार्टफोन्स, किंमत 18 हजारांपासून सुरू

Best Camera Smartphones in 2024: स्मार्टफोन म्हटलं की सर्वात आधी आपण त्यात किती मेगापिक्सल कॅमेरा आहे हे पाहतो. सध्या बाजारात दमदार कॅमेऱ्यासह येणारे एकापेक्षा एक चांगले स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी 200 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येणाऱ्या फोन्सची लिस्ट घेऊन आलो आहोत. या स्मार्टफोन्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Redmi Note 13 Pro – शाओमीच्या या फोनमध्ये 200MP + 8MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. केवळ 18,349 रुपयात येणाऱ्या या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर, AMOLED डिस्प्ले आणि 5100mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Redmi Note 13 Pro+ – रेडमीच्या या फोनची किंमत 23739 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये 200 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन Mediatek Dimensity 7200 प्रोसेसर, 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 120 वॉट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
Honor 90 – हॉनरचा हा फोन Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरसह येतो. यामध्ये 6.7 इंच एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 200MP + 12MP + 2MP चा ट्रिपल रियर आणि 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5000 एमएएच बॅटरीसह येतो.
Samsung Galaxy S23 Ultra- सॅमसंगच्या या फोनची किंमत 76,999 रुपये आहे. हा फोन Snapdragon 8 Gen 2 सह येतो. यामध्ये फोटोग्राफीसाठी 200MP + 12MP + 10MP + 10MP रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तुम्ही जर फ्लॅगशिप स्मार्टफोन शोधत असाल, तर हा तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.
Samsung Galaxy S24 Ultra – सॅमसंगच्या या फोनमध्ये तुम्हाला 200MP + 50MP + 12MP + 10MP क्वाड रियर कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 6.8 इंच डिस्प्लेसह येतो. 5000 एमएएच दमदार बॅटरीसह येणाऱ्या या फोनला तुम्ही 1 लाख 21 हजार रुपयांच्या सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता.





