Ramesh Pardeshi : मराठी अभिनेत्याला पितृशोक! ‘पिट्याने खूप प्रयत्न करूनही…’; प्रवीण तरडेंची भावूक पोस्ट
Ramesh Pardeshi : रमेश परदेशी यांचे वडील परशुराम लक्ष्मण परदेशी यांनी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला.

Ramesh Pardeshi : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून लोकप्रिय झालेला अभिनेता रमेश परदेशी उर्फ पिट्या भाई यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. रमेश परदेशी याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी दिली.
रमेश परदेशी यांचे वडील परशुराम लक्ष्मण परदेशी यांनी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांसह चाहत्यांनीही शोक व्यक्त करत परदेशी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
दरम्यान, रमेश परदेशी यांचे जवळचे मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी रमेश यांच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच या कठीण प्रसंगातून सावरण्यासाठी रमेशला बळ मिळावे, अशी प्रार्थना केली.
View this post on Instagram
प्रवीण तरडे यांनी आपल्या पोस्टमध्ये, “पिट्या, खूप प्रयत्न करूनही त्यांना वाचवू शकला नाहीस. परमेश्वर दादांच्या आत्म्यास शांती देवो आणि पिट्याला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो,” अशी भावनी व्यक्त केली. यासोबतच त्यांनी रमेश परदेशी यांच्या वडिलांसोबतचा एक फोटोही शेअर केला.
View this post on Instagram
पोस्टमध्ये प्रवीण तरडे म्हणतात “मित्राचे वडील हे सुध्दा एक खूप सुंदर नातं असतं.. आपल्या मित्राच्या मैत्री बरोबर ते सुध्दा पिकत जातं.. पिट्या चे वडील आज गेले शुन्यातून स्वतःचं विश्व निर्माण केलेला माणूस.. त्यांच्या सारखी डाय बनवणारा कुशल डायमेकर माझ्या पहाण्यात दुसरा नाही.. लहानपणापासूनच्या खुप आठवणी आहेत त्यांच्या..मागचे सहा महीने आजारी होते.. पिटयाने खूप प्रयत्न केले.. पण नाही वाचवू शकला त्यांना.. परमेश्वर दादांच्या आत्म्यास शांती देवो.. आणि पिट्याला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.. ओम शांती
Jejuri : जेजुरीतील कडेपठारावरील डोंगररांगेत फटाक्यांमुळे वणवा





