Benefits of Coconut : हिवाळ्यात ‘ओलं खोबरं’ खाणे फायदेशीर का? जाणून घ्या त्यामागचे कारण, होईल मोठा फायदा !

Benefits of Coconut : वर्षातील सर्वात बहुप्रतीक्षित ऋतू म्हणजेच हिवाळा सुरू आहे. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशामध्ये वर्षातून अधिक काळ उष्णतेचा त्रास सहन करावा लागतो, ज्यामुळे हिवाळ्यातील थंडावा या उष्णतेपासून मोठया प्रमाणात आराम देतो. तसेच या दिवसात आपण कोणते पदार्थ खाऊ नये किंवा कोणत्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा असे अनेक सल्ले लोक देत असतात.
मात्र, हिवाळ्यात ‘ओलं खोबरं’ खाण्याचा सल्ला का दिला जातो? याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. कारण आता नारळ तुमच्यासाठी फक्त चवीचा स्रोत नाही. आता नारळ हेही आरोग्याचे साधन बनले आहे. विशेषतः जेव्हा तुम्ही ते हिवाळ्यात खाण्यास सुरुवात करता. खोबऱ्याचा वापर रोज घराघरांमध्ये वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. खोबऱ्याने पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात.
हिवाळ्यात ‘ओलं खोबरं’ खाण्याचे फायदे एकदा पाहाच :
– ओल्या खोबऱ्यामध्ये अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. तसेच यात भरपूर आयर्न आणि फायबरही असतं.
– कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअमही भरपूर असतं.
– ओलं खोबरं खाऊन केवळ शरीरालाच नाही तर मेंदुला देखील अनेक फायदे मिळतात. यात आयर्न आणि व्हिटॅमिन बी6 आढळतं जे मेंदुची काम करण्याची क्षमता वाढवतं. तसेच स्मरणशक्तीही वाढते.
– हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, ओल्या खोबऱ्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत मिळते. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी याचा त्यांचा आहारात समावेश करावा.
– ओल्या खोबऱ्यामध्ये व्हिटॅमिन्ससोबतच अनेक अॅंटी ऑक्सिडेंट्सही असतात. जे त्वचा आणि केसांना भरपूर पोषण देतात. यात आढळणारं व्हिटॅमिन ई त्वचा उजळवतं. तसेच याच्या सेवनाने केसांचा रखरखीतपणा दूर होते.
– हिवाळ्यात नियमितपणे ओलं खोबरं खाल्लाने स्मरणशक्ती वाढते. यासाठी खोबऱ्याच्या पेस्टमध्ये बदाम मिश्रित करुन रोज खावे. खोबऱ्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल अधिक प्रमाणात असतं जे तुमचं आरोग्य चांगलं ठेवतं.
– जर तुमचं पोट खराब झालं असेल तर ओल्या खाबऱ्याचा एक मोठा तुकडा रात्री खाऊन झोपा. सकाळी तुमचं पोट साफ होणार. यात फायबर अधिक प्रमाणात असल्याने यामुळे पोट साफ होतं.
– उन्हाळ्यात ओमोटींगची समस्या अनेकांना भेडसावते. वाढतं तापमान आणि घाम यामुळे असे होते. तुम्हाला जर ओमोटींग झाल्यासारखे वाटत असेल तर खोबऱ्याचा एक तुकडा खावा, याने तुम्हाला आराम मिळेल.
– खोबऱ्याच्या सेवनाने इम्यून सिस्टम मजबूत होतं. यात अॅंटी बॅक्टेरिअल, अॅंटी फंगल आणि अॅंटी व्हायरल तत्व असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.





