IND vs ENG : ‘बुमराहला भीत नाही…’, हेडिंग्ले कसोटीपूर्वी बेन स्टोक्सचं वक्तव्य; म्हणाला, ‘फक्त एकटा भारताला…’

IND vs ENG Ben Stokes Statement on Jasprit Bumrah : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका शुक्रवारी सुरू होणार आहे. पुढील सहा आठवड्यांत भारत आणि इंग्लंड पाच कसोटी सामने खेळणार असून, नव्या जागतिक कसोटी अजिंक्यपद चक्राची सुरुवात करणार आहेत. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या नव्या मोसमाला प्रारंभ करेल. दौऱ्याच्या सुरुवातीपूर्वी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांचा संघ जसप्रीत बुमराहला घाबरत नाही.
एकट्याच्या जोरावर मालिका जिंकता येत नाही – स्टोक्स
बेन स्टोक्स म्हणाला की, बुमराह हा जागतिक दर्जाचा गोलंदाज असला तरी तो एकट्याच्या जोरावर भारताला कसोटी मालिका जिंकून देऊ शकत नाही. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मानतो की त्यांच्या संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांचा सामना करावा लागतो. ते आपल्या विरोधकांचा आदर करतात, पण त्यांच्या संघाला त्यांची भीती वाटत नाही.
बेन स्टोक्स बुमराहबद्दल काय म्हणाला?
“We know it’s going to be tough, it always is against India” 🏴🇮🇳
Hear from Ben Stokes ahead of the first England vs India Test 🔊 pic.twitter.com/rdpiI6WKpG
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 19, 2025
हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी बुमराहबद्दल बेन स्टोक्स म्हणाला, “आम्हाला कोणतीही भीती वाटत नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने उत्कृष्ट संघांविरुद्ध खेळतो. आम्हाला बुमराहचा दर्जा माहित आहे आणि तो ज्या संघासाठी खेळतो, त्यात त्यांचे योगदान काय आहे हेही आम्हाला ठाऊक आहे. पण भीतीच्या बाबतीत, आम्ही निश्चितच निर्भय आहोत.”
हेही वाचा – Mukesh Kumar : ‘कर्माची फळं नक्की मिळणार…”, मुकेश कुमारचा गंभीर-हर्षितवर निशाणा? व्हायरल पोस्टने वेधलं लक्ष
बेन स्टोक्स पुढे म्हणाला, “मला वाटत नाही की एक गोलंदाज स्वतःच्या बळावर कोणत्याही संघासाठी मालिका जिंकू शकेल. कारण मालिका जिंकण्यासाठी सर्व ११ खेळाडूंनी एकत्र येऊन योगदान द्यावे लागते. त्यामुळे मला वाटते की फक्त एक खेळाडू कोणत्याही संघाला यश मिळवून देऊ शकत नाही.” जसप्रीत बुमराहचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड उत्तम आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या १४ सामन्यात ६० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने इंग्लंडमध्ये ९ कसोटी सामने खेळले आहेत आणि ३७ विकेट्स घेतल्या आहेत





