Ben Stokes Injury : धक्कादायक! बेन स्टोक्सच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत; थोडक्यात वाचला डोळा, फोटो होतोय व्हायरल
Ben Stokes Injury : स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सध्या एका भीषण दुखापतीमुळे चर्चेत आला आहे.

Ben Stokes face injury photo viral : इंग्लंड क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स सध्या एका भीषण दुखापतीमुळे चर्चेत आला आहे. स्टोक्सच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याचा चेहरा ओळखणेही कठीण झाले आहे. या घटनेचे फोटो त्याने स्वतः सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.
डोळा थोडक्यात वाचला; चेंडूचा बसला भीषण फटका
बेन स्टोक्सने इन्स्टाग्राम स्टोरीवर आपल्या चेहऱ्याचा फोटो पोस्ट केला आहे. यात त्याच्या डोळ्याखाली मोठा काळा डाग आणि नाकाजवळ जखमेच्या खुणा दिसत आहेत. ही दुखापत चेंडू लागल्यामुळे झाल्याचे समजते. स्टोक्सने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्ही क्रिकेट बॉलची अवस्था देखील पाहायला हवी.” त्याच्या या विधानावरून चेंडू किती वेगाने आणि जोरात लागला असेल, याचा अंदाज येतो. जर हा चेंडू एक इंच वर लागला असता, तर स्टोक्सला आपला डोळा गमवावा लागला असता आणि त्याचे करिअर धोक्यात आले असते.
स्टोक्स आणि दुखापतींचे जुने नाते –
Ben Stokes’ Instagram story. 😱
– Get well soon, Ben! pic.twitter.com/L2etpg1ZsF
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 5, 2026
बेन स्टोक्सचे करिअर दुखापतींनी ग्रासलेले राहिले आहे. मैदानाबाहेरील रागामुळे किंवा खेळादरम्यान लागलेल्या जखमांमुळे तो अनेकदा संघाबाहेर राहिला आहे:
- २०१४ (बोटाची दुखापत): वेस्ट इंडिज दौऱ्यात शून्यवर बाद झाल्यानंतर रागाच्या भरात ड्रेसिंग रूमच्या लॉकरवर जोरात पंच मारल्याने त्याच्या उजव्या हाताची कलाई तुटली होती. यामुळे तो २०१४ च्या टी-२० वर्ल्ड कपला मुकला होता.
- २०२१ (मानसिक ताण आणि दुखापत): बोटाच्या दुखापतीमुळे आणि मानसिक आरोग्यासाठी त्याने क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता.
- २०२३-२५ (हॅमस्ट्रिंग आणि खांदा): ‘द हंड्रेड’ दरम्यान त्याला गंभीर हैमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. तसेच २०२५ मध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे तो भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याला मुकला होता.
चाहत्यांची चिंता वाढली –
Ben Stokes suffers serious facial injury
स्टोक्स सध्याच्या घडीला इंग्लंडच्या कसोटी संघाचा कणा आहे. अशा परिस्थितीत त्याच्या चेहऱ्याला लागलेली ही दुखापत किती खोलवर आहे आणि तो कधी मैदानावर परतणार, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र, फोटोतील त्याची अवस्था पाहून चाहते त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.





