Ben Stokes Coach : बेन स्टोक्स आता ‘कोच’च्या भूमिकेत! पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंड बोर्डाचा मोठा मास्टरप्लॅन
Ben Stokes Coach : इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याला खेळाडूऐवजी 'कोचिंग स्टाफ' मध्ये स्थान देण्यात आले आहे.

Ben Stokes Coach of England Lions Team : इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) आगामी पाकिस्तान शाहीन विरुद्धच्या मालिकेसाठी सर्वांना चकित करणारा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स याला खेळाडूऐवजी ‘कोचिंग स्टाफ’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. अबुधाबी येथे होणाऱ्या या व्हाईट-बॉल (टी-२० आणि वनडे) मालिकेसाठी बेन स्टोक्स आता युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसणार आहे.
मैदानात नव्हे, डगआऊटमध्ये दिसणार स्टोक्स!
फेब्रुवारी २०२६ मध्ये अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर इंग्लंड लायन्स आणि पाकिस्तान शाहीन यांच्यात तीन टी-२० आणि पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगणार आहे. बेन स्टोक्स सध्या त्याच्या ‘ग्रोइन इंजरी’ (Groin Injury) मधून सावरत आहे. अॅशेज मालिकेतील पाचव्या सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. या रिकव्हरी कालावधीचा सकारात्मक वापर करण्यासाठी ईसीबीने त्याला प्रशिक्षक गटात सामील केले आहे.
दिग्गजांची फौज प्रशिक्षक पदी –
इंग्लंड लायन्सच्या या दौऱ्याचे मुख्य प्रशिक्षक म्हणून अँड्र्यू फ्लिंटॉफ काम पाहत आहेत. स्टोक्सने यापूर्वी ‘द हंड्रेड’मध्ये फ्लिंटॉफसोबत मेंटर म्हणून काम केले आहे. याशिवाय अलीकडेच निवृत्ती मागे घेतलेला स्टार ऑलराउंडर मोईन अली देखील या कोचिंग स्टाफचा भाग असणार आहे. याव्यतिरिक्त नील मॅकेन्झी, सारा टेलर आणि अमर रशीद यांसारखे दिग्गजही युवा खेळाडूंना घडवण्यासाठी सज्ज आहेत.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळाली
२०२७ च्या वर्ल्ड कपवर नजर –
२०२७ च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपसाठी संघ बांधणी करण्याच्या उद्देशाने इंग्लंड लायन्सने तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच व्हाईट-बॉल मालिकेचे आयोजन केले आहे. युवा खेळाडूंना बेन स्टोक्स आणि फ्लिंटॉफ यांसारख्या मोठ्या खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा व्हावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे.
इंग्लंड लायन्सचा संघ (महत्त्वाचे खेळाडू):
टी-२० संघ: सोनी बेकर, ल्यूक बेनकेन्स्टाईन, जेम्स कोल्स, सॅम कुक, जॉर्डन कॉक्स (कर्णधार), स्कॉट करी, कॅल्विन हॅरिसन, एडी जॅक्स, साकिब महमूद, बेन मॅककिनी, टॉम मूर्स, डॅन मौस्ली, मॅट रेव्हिस, विल स्मीड, नॅथन सॉटर, मिचेल स्टॅनली, आसा ट्राइब.
वनडे संघ: सोनी बेकर, ल्यूक बेनकेन्स्टाईन, जेम्स कोल्स, सॅम कुक, जॉर्डन कॉक्स, स्कॉट करी, कॅल्विन हॅरिसन, एडी जॅक्स, बेन मॅककिनी, डॅन मौस्ली (कर्णधार), लियाम पॅटरसन-व्हाइट, मॅथ्यू पॉट्स, मॅट रेव्हिस, जेम्स रेव, मिचेल स्टॅनली, आसा ट्राइब, जेम्स व्हार्टन.





