AUS vs ENG : बेन स्टोक्सने रचला इतिहास! १९८२ नंतर ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियात ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच इंग्लिश कर्णधार

Ben Stokes Record in AUS vs ENG 1st Test : पर्थ येथे सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस ऐतिहासिक ठरला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याच्या धारदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने दिवसाखेर ९ विकेट्स गमावून केवळ १२३ धावा केल्या आहेत, तर इंग्लंड अजूनही पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा ४९ धावांनी आघाडीवर आहे. या कामगिरीच्या जोरावर स्टोक्सने ४३ वर्षांपूर्वीच्या एका खास विक्रमाची बरोबर केली.
बेन स्टोक्सची घातक गोलंदाजी –
पहिल्या डावात इंग्लंडचा संघ मिचेल स्टार्कच्या (७ विकेट्स) माऱ्यापुढे १७२ धावांत गारद झाला होता. मात्र, त्यानंतर कर्णधार बेन स्टोक्सने गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे सांभाळली. स्टोक्सने आपल्या भेदक माऱ्याचा नमुना सादर करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिले नाही. त्याने अवघ्या ६ षटकांत २३ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ५ प्रमुख फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली.
४३ वर्षांनंतर खास विक्रमाची पुनरावृत्ती –
5-fer in just his 6 overs today. 💥
His first Test as captain in Australia and he leads from the front for his team when his team needed most. 👏
Ben Stokes – The main man of England cricket, The MVP! 🫡🔥
Well done, Skipper! 🙌#BenStokes #AUSvENG #Ashes #Ashes2025 pic.twitter.com/rGteuHlDCX
— Saabir Zafar (@Saabir_Saabu01) November 21, 2025
बेन स्टोक्सने केलेली ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे. ४३ वर्षांनंतर अशी पहिली वेळ आहे, जेव्हा ॲशेस मालिकेमध्ये इंग्लंडच्या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. यापूर्वी, १९८२ मध्ये इंग्लंडचे कर्णधार बॉब विलिस यांनी ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ विकेट्स घेतल्या होत्या. बेन स्टोक्सच्या दमदार कामगिरीमुळे या ४३ वर्षांपूर्वींच्या खा विक्रमाची पुनरावृत्ती झाली आहे.
बेन स्टोक्सची कसोटी कारकीर्द –
२०१३ मध्ये कसोटी पदार्पण केलेल्या बेन स्टोक्सने आजवर इंग्लंड संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे. त्याने ११६ कसोटी सामन्यांमध्ये ७०३८ धावा आणि २३५ विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी कारकिर्दीत सहाव्यांदा त्याने ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.





