Chhagan Bhujbal : ‘मुख्यमंत्री होणे हा त्यांचा हक्क….’; छगन भुजबळांनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा; काय म्हणाले पाहा….

Chhagan Bhujbal | Devendra Fadnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीने मोठे यश मिळवले. यात आता मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी बुधवारी माघार घेतली. मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील, त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यानंतर आता मुख्यमंत्री भाजपचा असणार हे आता जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
यावर आता अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाबाबत शुभेच्छा देखील दिल्या आहेत. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “ओबीसी मुख्यमंत्री व्हावा यापेक्षा गोर गरिबांच संरक्षण करणारा मुख्यमंत्री राज्याला भेटावा ही अपेक्षा भाजपचाच मुख्यमंत्री होईल.
देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या काही वर्षांमध्ये काम केलं याआधी ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते पण पक्षाने त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून काम दिलं त्यांनी काम केलं आणि झोकून काम केलं. मुख्यमंत्री होणे देवेंद्र फडणवीस यांचा नैसर्गिक हक्क आमच्या त्यांना शुभेच्छा’. असं ते यावेळी म्हणाले. अजित पवार मुख्यमंत्री झाले तरी चांगलं, पण यावेळी 132 आमदार त्यांचे आहेत म्हणून त्यांचा मुख्यमंत्री होईल फडणवीस झाले तरी आनंदच होईल. असं यावेळी भुजबळ म्हणाले.
मनोज जरांगे यांना टोला !
ईव्हीएम मशीन ने जिंकलो असेल तर मला देखील एक लाख मत मिळायला हवी होती. माझं मताधिक्य वाढायला हवं होतं ते कमी झालं. मनोज जरांगे पाटील साहेब आदल्या दिवशी सकाळी दहा पासून रात्री दोन पर्यंत गावोगावी फिरले आणि जातिवाद पसरवण्याच काम केलं म्हणून माझं मताधिक्य कमी झालं.





