‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाच्या रिलीजपूर्वी विक्रांतने गोध्रा स्थानकाला दिली भेट

Vikrant Messey | अभिनेता विक्रांत मेस्सीच्या ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी साबरमती एक्सप्रेसच्या डब्यांना गोध्रा स्थानकावर अचानक आग लागली होती. त्यावर आधारित या चित्रपटाचे टीमकडून जोरदार प्रमोशन केले जात आहे. यादरम्यान, विक्रांतने गोध्रा स्टेशनला अचानक भेट दिली. त्याचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
साबरमतीच्या घटनेमध्ये गोध्रा स्थानकाला भेट देणं हा विक्रांतसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट 15 नोव्हेंबर 2024ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. साबरमती एक्स्प्रेस दुर्घटनेबाबत 22 वर्षांपासून दडलेली माहिती या चित्रपटातून समोर येणार आहे.
27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळच्या सुमारास गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्स्प्रेसला आग लावण्यात आली. साबरमती एक्स्प्रेसला लावण्यात आलेल्या घटनेत 59 कारसेवकांचा जळून मृत्यू झाला होता. हे कारसेवक अयोध्येवरून परतत होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये भीषण दंगल उसळली होती. या घटनेचे देशभरात पडसाद उमटले होते.
या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये विक्रांतची दमदार शैली पाहायला मिळाली. ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटात अभिनेता विक्रांत मॅसी न्यूज अँकर समर कुमारच्या भूमिकेत दिसणार आहे. बालाजी मोशन पिक्चर्स आणि विकीर फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत, ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये विक्रांत मॅसी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा मुख्य भूमिकेत आहेत. धीरज सरना दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर, एकता आर कपूर, अमूल व्ही मोहन आणि अंशुल मोहन यांनी केली आहे.
अलिकडेच विक्रांतच्या ’12वी फेल’ चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित या चित्रपटात विक्रांतने दमदार अभिनयाने लोकांची मनं जिंकली होती.
हेही वाचा:
बाबू भैय्या, राजू आणि शाम एकत्र; ‘हेरा फेरी ३’च्या शुटींगला झाली सुरुवात?





