बाबू भैय्या, राजू आणि शाम एकत्र; ‘हेरा फेरी ३’च्या शुटींगला झाली सुरुवात?

Hera Pheri 3 | बॉलीवूडचा ‘हेरा फेरी’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यातील राजू, बाबुराव आणि शामच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. या चित्रपटाच्या दोन भागानंतर काही दिवसांपूर्वी तिसऱ्या भागाची घोषणा करण्यात आली होती. आता या चित्रपटाच्या शुटींगला देखील सुरुवात झाल्याची चर्चा होत आहे. नुकतेच मुंबई विमानतळावर अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे ‘हेरा फेरी 3’ चित्रपटाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
मुंबई विमानतळावर या तिघांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनिल शेट्टी हे तिघेजण विमानतळावर एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. विमानतळाबाहेरही या कलाकारांनी फोटोसाठी पोज दिली आहे. हे तिघे एकत्र दिसल्याने हेराफेरीच्या तिसऱ्या भागासाठी ते एकत्र आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
मात्र सुनिल शेट्टीने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत धुम धडाका ऑकेस्ट्रा परत एकत्र असं लिहिले आहे. आणि त्याखाली पण हेरा फेरीसाठी एकत्र आलो नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. अक्षय कुमारच्या कुडोआंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी एकत्र आल्याचे त्याने या पोस्टमध्ये सांगितले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, 2000 मध्ये कॉमेडी किंग दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली ‘हेरा फेरी’ हा चित्रपट सुरू झाला होता. ज्यामध्ये राजू (अक्षय कुमार), श्याम (सुनील शेट्टी) आणि बाबू राव (परेश रावल) यांचा ग्रुप एकत्र दिसत होता. हा चित्रपट यशस्वी झाला आणि त्याचा सिक्वेल हेरा फेरी 2006 मध्ये आला आणि त्याला प्रचंड यश मिळाले. आता त्याच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. Hera Pheri 3 |
केवळ हेरा फेरी फ्रँचायझीच नाही तर अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी हे त्रिकूट इतर अनेक कॉमेडी चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहे. त्यात दे दना दन, आवारा पागल दीवाना आणि दिवाने हुए पागल यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.
हेही वाचा:
“मराठा समाजाची कांड्यावर मोजण्याइतकी मतं…”; भाजप नेत्याची वादग्रस्त विधानानंतर सारवासारव





