Beed Accident News : बीडच्या मांजरसुंबा घाटात अपघातांची मालिका; एकाच दिवशी चार अपघातांत दोघांचा मृत्यू, सहा जण गंभीर जखमी!
Beed Accident News : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड नजीकच्या कुख्यात मांजरसुंबा घाटात अपघातांची भीषण मालिका सुरूच आहे.

Beed Accident News : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीडच्या मांजरसुंबा घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे. घाटातील कोळवाडी परिसरात एकाच दिवसात चार विचित्र अपघात घडले असून या अपघातांमध्ये दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. (Beed Accident News)
सकाळी पवनचक्कीचे साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. त्यानंतर दिवसभरात याच परिसरात आणखी तीन अपघात घडले. मांजरसुंबा घाटातील हा परिसर अपघातप्रवण ठिकाण म्हणजेच ब्लॅक स्पॉट बनला असून, वारंवार अपघात होऊनही महामार्ग प्रशासन आणि कंत्राटदारांकडून आवश्यक उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. (Beed Accident News)
पवनचक्की साहित्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांच्या बेशिस्तपणामुळेही अपघात घडत असल्याचा आरोप आहे. या अपघातांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ब्लॅक स्पॉटवर तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. (Beed Accident News)
Accident News : नागरगाव चौफुला येथे चारचाकीची दुचाकीला जोरदार धडक; पती, पत्नी व ११ वर्षीय मुलगा जखमी



