Vaibhav Chavan : बीड हादरले! पोलीस भरतीतील क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा उघड करणाऱ्या खेळाडूचा गूढ मृत्यू; शरीरावर मारहाणीच्या खुणा, घातपाताचा संशय
Vaibhav Chavan : १४ पोलिसांच्या निलंबनाला व अटकेला कारणीभूत ठरलेला नवगण राजुरी (जि. बीड) येथील राष्ट्रीय कराटेपटू वैभव चव्हाण (वय २४) याचा संशयास्पद परिस्थितीत गूढ मृत्यू झाला आहे.

Vaibhav Chavan : पोलीस भरतीत खेळाडू कोट्यातून बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्यांचे मोठे रॅकेट उघडकीस आणणाऱ्या नवगण राजुरी (जि. बीड) येथील वैभव चव्हाण (24) या तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आला आहे. (Vaibhav Chavan)
इमामपूर शिवारात वैभवचा मृतदेह गुरुवारी मिळून आल्यानंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. त्याच्या अंगावर आणि पायांवर मारहाणीच्या गंभीर जखमा असल्याचा दावा करत नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. (Vaibhav Chavan)
वैभव चव्हाण हा कराटे स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू असून त्याच्याकडे राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अधिकृत प्रमाणपत्रे होती. 2024-25 च्या धाराशिव पोलीस भरतीमध्ये खेळाडू कोट्यातून त्याने अर्ज केला होता. मात्र, वेटिंग लिस्टमध्ये असताना त्याच्या पुढील उमेदवाराने बोगस क्रीडा प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवल्याचा संशय त्याला आला. (Vaibhav Chavan)
याप्रकरणी वैभवने क्रीडा आयुक्तालय बालेवाडी (पुणे) येथे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनंतर कुराश असोसिएशनच्या अध्यक्ष, सचिवांसह अनेक जिल्हाध्यक्षांवर गुन्हे दाखल झाले होते. पुण्यात पोलीस भरतीत लागलेल्या 19 जणांपैकी ड्युटीवर असलेल्या 9 पोलिसांना थेट जेलमध्ये जावे लागले होते. (Vaibhav Chavan)
तक्रार केल्यानंतर बोगस प्रमाणपत्र माफियांकडून आपल्या आणि मित्राच्या जीवाला धोका असल्याचे सांगणारा वैभवचा एक ऑडिओ मेसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. (Vaibhav Chavan)
Vaibhav Khedekar : अखेर वैभव खेडेकरांचा भाजपमध्ये प्रवेश, तीनवेळा हुकला होता मुर्हूत





