खाद्यपदार्थ पार्सल देण्यास पथारी व्यावसायिकांना मुभा
Updated On:

पुणे – शहरात पुढील सात दिवस हॉटेल, मॉल, रेस्टॉरंट, बार, फूडकोर्ट सात दिवस पूर्णपणे बंद असतील. पण, हातावर पोट असणाऱ्या टपरी व्यावसायिकांना दिलासा देण्यात आला असून, टपरीच्या ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यास मनाई करण्यात आली आहे. पण, त्यांना ग्राहकांना पार्सल देण्यास मुभा देण्यात आली आहे.
तसेच हॉटेल्सनाही रात्री 11 पर्यंत खाद्यपदार्थ पार्सल देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी शहरातील वाढीव संचारबंदीबाबत काढलेल्या आदेशात ही परवानगी देण्यात आली आहे.
या आदेशात पीएमपीची सेवा पुढील सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले असून, खासगी आस्थापना आणि औद्योगिक संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीची सुविधा आपल्या स्तरावर करण्याचे आदेशात म्हटले आहे.



