पापाराझींसमोर पोज, गाडीत बसल्यानंतर बेबोच्या डोळ्यात पाणी; सोनमच्या बर्थडे पार्टीत काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

Kareena Kapoor : ‘सावरिया’ या चित्रपटातून बॅालीवूड इंडस्ट्रीत पदार्पण करणारी अभिनेत्री सोनम कपूर ४० व्या वर्षांत पदार्पण करत आहे. नुकतेच तिच्या बर्थडी पार्टीचे आयोजन अनिल कपूर यांच्या बंगल्यावर करण्यात आले होते. या पार्टीला बॅालीवूड इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
अभिनेत्री करीना कपूरही सोनमला तिच्या ४० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होती. पार्टी आटपून अभिनेत्री करिना कपूर गाडीत बसल्यानंतर तिचे डोळे पाण्याने भरून आले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री करीना कपूर सोनमची बर्थडे पार्टी आटपून बाहेर आली. तिच्या स्टायलिश पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तिने पापाराझींसमोर पोजही दिली. त्यानंतर ती गाडीत बसली. गाडीत बसल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी आले आणि आपले पाणावलेले डोळे पुसत होती.
हे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी ती खूप भावनिक झाल्याचे दिसत आहे. पण यामागचे नेमकं कारण काय होतं हे समजू शकलेले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
View this post on Instagram
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले “सैफने नक्कीच फटकारले असेल.”एका चाहत्याने लिहिले की, “ती देखील एक माणूस आहे… तिला तिच्या भावना व्यक्त करू द्या अशा अनेक कमेंट्स या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
करीनाने आतापर्यंत तिच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मेघना गुलजार यांच्या आगामी ‘दायरा’ या चित्रपटात करीना कपूर खान पृथ्वीराज सुकुमारनसोबत दिसणार आहे. यापूर्वी, करीनाने हंसल मेहतांच्या द बकिंगहॅम मर्डर्स या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
हेही वाचा: ‘बिग बॉस ओटीटी ३’ची विजेती सना मकबूल रुग्णालयात दाखल




