लाडक्या बहिणींनो तयार रहा ! आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात ; 1500 की 2100 रुपये मिळणार? वाचा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana । राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर योजना ठरली होती. त्यामुळेच महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वच बहिणींचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी आश्वासन पूर्ती केली असल्याचे दिसत आहे. कारण हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी रुपयांची तरतूद Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ।
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम जमा आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी महिला व बालविकास कल्याण विभागाकडे तब्बल 3500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्याने ती पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana ।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीने मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, डिसेंबरचा हप्ता पूर्वीप्रमाणे म्हणजे 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.





