सावध रहा! कोविन पोर्टलवरील तुमचा डेटा असुरक्षित; आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये वाढ

नवी दिल्ली : केंद्र सरकार सध्या डिजिटायझेशनला चालना देत आहे. मात्र, देशात अद्याप डेटा संरक्षण कायदा नसतानाही भारतात आरोग्य सेवा क्षेत्राचे डिजिटलायझेशन आक्रमकपणे विस्तारत आहे. भारत सरकारकडून करोनाकाळात कोविन अॅप, आरोग्य सेतू अॅप यांसारखे डिजिटल पर्याय निवडले. भारत डिजिटल इंडिया बनण्याचा प्रयत्न करत असताना, असे सायबर हल्ले होणे ही चिंतेची बाब आहे. कारण आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये भारत जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत सरकारने 2021 मध्ये, कोविड-19 विरुद्ध लसीकरण रेकॉर्ड करण्यासाठी CoWIN पोर्टल आणि अॅप वापरण्यास सुरुवात केली. 2021 मध्ये आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर होता. CloudSEK या सायबर धोक्यांची भविष्यवाणी करणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीने 18 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार ही माहिती समोर आली होती.
लसीकरण नोंदणी किंवा कोविन अॅप यांसारख्या आरोग्य सेवेसंबंधित पोर्टलवर अनेक नागरिकांचा डेटा उपलब्ध आहे. यामध्ये नाव, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर यांसारख्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. वेळीच योग्य उपाययोजना न केल्या भविष्यात मोठा सायबर हल्ला होण्याची शक्यता आहे. हॅकर्सकडून नागरिकांच्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर होऊ शकतो, ही चिंतेची बाब आहे.
आता पुन्हा एकदा 2022 मध्ये आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ले होणाऱ्या यंत्रणेमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सायबर हल्ल्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. जागतिक स्तरावर 2021 च्या तुलनेत 2022 वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत आरोग्य यंत्रणेवरील सायबर हल्ल्यांमध्ये 95.35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी क्लाउडसेकच्या अहवालात असे आढळून आले आहे की कोविड-19 मुळे आरोग्य क्षेत्राच्या तंत्रज्ञानात वेगाने बदल झाल्यामुळे अनेक असुरक्षितता निर्माण झाल्या आहेत.णेवर हल्ले करत आहेत.




