BCCI Prize Money : बीसीसीआयने टीम इंडियासाठी उघडला खजिना! विश्वविजेत्या संघावर पाडला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा पाऊस
BCCI Prize Money : आता बीसीसीआयनेही खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवडकर्त्यांसाठी तब्बल इतक्या कोटी रुपयांच्या रोख पुरस्काराची घोषणा केली आहे.

BCCI Prize Money Team India T20 WC 2026 : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. ८ मार्च रोजी न्यूझीलंडचा पराभव करून विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या टीम इंडियाला (Team India) आयसीसीकडून (२७.४८ कोटी) बक्षीस रक्कम मिळालीच आहे, पण आता बीसीसीआयनेही खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि निवडकर्त्यांसाठी तब्बल १३१ कोटी रुपयांच्या रोख पुरस्काराची घोषणा केली आहे.
ऐतिहासिक कामगिरीची मोठी पावती – BCCI Prize Money
बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी या बक्षीस रकमेची अधिकृत घोषणा केली. “भारतीय क्रिकेट संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ज्या पद्धतीने खेळ केला, तो अभिमानास्पद आहे. या विजयामुळे भारत केवळ आपले जेतेपद राखणारा पहिला संघ ठरला नाही, तर तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा जगातील एकमेव संघ बनला आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल बोर्ड सर्व खेळाडू आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत आहे,” असे सैकिया यांनी नमूद केले.
🚨 News 🚨
BCCI announces a cash reward of INR 131 crore for #TeamIndia following their triumphant campaign in the ICC Men’s T20 World Cup 2026.
🔽 Details | #T20WorldCup | #MenInBlue https://t.co/eagTz1eOUb
— BCCI (@BCCI) March 10, 2026
९६ धावांनी मिळवला होता मोठा विजय – BCCI Prize Money
अंतिम सामन्यात भारतीय फलंदाजांनी २५० पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभा केला होता. त्यानंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव १५९ धावांत गुंडाळून ९६ धावांनी विजय साकारला. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघाने केवळ एक सामना गमावला आणि आपली विजयाची घोडदौड कायम ठेवली. या विजयाने टी-२० फॉरमॅटमध्ये भारताचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
टीम इंडियाच्या नावावर ८ ट्रॉफींची नोंद –
भारताने आपली पहिली आयसीसी ट्रॉफी १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकली होती, तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे एकही खिताब नव्हता. भारताने आतापर्यंत २ वेळा वनडे विश्वचषक (१९८३, २०११) आणि विक्रमी ३ वेळा टी-२० विश्वचषक (२००७, २०२४ आणि २०२६) जिंकला आहे. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचा रेकॉर्ड चांगला असून संघाने ३ वेळा (२००२, २०१३ आणि २०२५) हे जेतेपद पटकावले आहे. भारताला अजूनही जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या (WTC) गदेची प्रतीक्षा आहे. BCCI Prize Money





