IPL 2025 मध्ये खळबळ! बीसीसीआयच्या नव्या नियमावर केकेआरचा आक्षेप, काय आहे कारण?

BCCI’s New IPL 2025 Rule Sparks Controversy with KKR : आयपीएल २०२५ चा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या हंगामातील प्लेऑफचे तिकीट आरसीबी, जीटी आणि पीबीकेएस संघांनी पटकावली आहेत. आता एका संघाची प्लेऑफमधील जागी शिल्लक असताना बीसीसीआयने एक मोठे पाऊल उचलले, जे आता चर्चेचा विषय बनले आहे. बीसीसीआयने आयपीएलबद्दल नवीन नियम जाहीर केला आहे, ज्यावर केकेआर संघाने नाराजी व्यक्त केली आहे. काय आहे नवीन नियम? जाणून घेऊया.
काय आहे नवा नियम?
पूर्वी, आयपीएल लीग स्टेज सामन्यांसाठी कट-ऑफ वेळ रात्री १०:५६ होती, परंतु नवीन नियम आल्यानंतर, ही वेळ आता रात्री ११:५६ झाली आहे. बीसीसीआयने २० मे पासून हा नियम लागू केला आहे, पण आता कोलकाता नाईट रायडर्सने त्यावर आक्षेप घेतला आहे. केकेआरने आयपीएलला एक मेल लिहून म्हटले आहे की, या हंगामात पावसामुळे कोलकात्याला मोठे नुकसान सहन करावे लागले असल्याने हे पाऊल आधीच उचलायला हवे होते.
KKR WRITES TO THE BCCI. ✍️
– KKR expressed their displeasure over mid season rule change.
– A 2 hour extra time might’ve helped their cause Vs RCB to get a possible 5 overs match.
– They believe such inconsistencies are not good for the IPL. (Cricbuzz). pic.twitter.com/I006USGbZ5— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 21, 2025
केकेआरने का व्यक्त केली नाराजी?
केकेआर आणि आरसीबी यांच्यातील सामना १७ मे रोजी खेळवला जाणार होता, जो पावसामुळे पूर्णपणे वाया गेला. सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. यापूर्वी, २६ एप्रिल रोजी पंजाब विरुद्ध केकेआर सामन्याचा निकाल पावसामुळे लागू शकला नव्हता. आयपीएलचे सीओओ हेमांग अमीन यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये, केकेआरचे सीईओ वेंकी म्हैसूर म्हणाले की, हंगामाच्या मध्यभागी परिस्थिती लक्षात घेता नियमांमध्ये हे बदल आवश्यक असू शकतात, परंतु हे बदल ज्या पद्धतीने अंमलात आणले जातात त्यामध्ये अधिक एकरूपता असायला हवी.
हेही वाचा – CSK vs RR : वैभव सूर्यवंशीने धोनीच्या पाया पडून जिंकली सर्वांची मनं, VIDEO होतोय व्हायरल
पावसाचा सर्वाधिक फटका केकेआरला बसला –
मेलमध्ये पुढे म्हटले आहे की, जेव्हा आयपीएल २०२५ पुन्हा सुरू झाले, तेव्हा हे स्पष्ट झाले होते की १७ मे रोजी कोलकाता आणि आरसीबी यांच्यात होणारा सामना पावसामुळे रद्द होऊ शकतो. हा अंदाज सर्वांना दिसत होता. जर हा नियम आधी असता, तर १२० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेमुळे केकेआर विरुद्ध आरसीबी सामना किमान ५-५ षटकांचा सामना होण्याची शक्यता होती. त्या सामन्यात पावसामुळे केकेआरची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता संपुष्टात आली. अशा प्रकारचे निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात विसंगती या पातळीच्या स्पर्धेसाठी योग्य नाही.





