RCB vs SRH : बीसीसीआयची आरसीबीवर मोठी कारवाई! कर्णधारासह संपूर्ण संघाला ठोठावला दंड

RCB vs SRH BCCI Fines RCB and SRH Captains for Slow Over-Rate : आयपीएल २०२५ चा ६५ वा सामना शुक्रवारी, २३ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात एसआरएचने आरसीबीचा ४२ धावांनी पराभव केला. या सामन्यातील एका चुकीसाठी बीसीसीआयने दोन्ही संघांच्या कर्णधारांना दंड ठोठावला आहे.
दोन्ही संघांच्या कर्णधारावर दंडात्मक कारवाई –
या सामन्यात आरसीबीचे नेतृत्व जितेश शर्माने केले होते, परंतु नियमित कर्णधार रजत पाटीदार आणि एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सवर स्लो ओव्हरमुळे कारवाई करण्यात आली आहे. यापैकी आरसीबीच्या कर्णधारा २४ लाख रुपये, तर एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या दोघांनाही स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावला आहे.
आरसीबीची हंगामातील दुसरी चूक –
The Curvv Super Striker of the Match between Royal Challengers Bengaluru and Sunrisers Hyderabad goes to Abhishek Sharma. #TATAIPL | #RCBvSRH | #CurvvSuperStriker | @TataMotors_Cars pic.twitter.com/sA9ZjJEBYe
— IndianPremierLeague (@IPL) May 23, 2025
या हंगामातील आरसीबीची ही दुसरी चूक होती, ज्यामुळे बीसीसीआयने रजत पाटीदारसह संपूर्ण संघावर दंडात्मक कारवाई केली आहे. ज्यामध्ये प्रभावशाली खेळाडूचा समावेश आहे, त्यांना वैयक्तिकरित्या ६ लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या २५ टक्के, जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा – Karun Nair : इंग्लंडविरुद्ध त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूचं कमबॅक! सात वर्षांनी टीम इंडियात मिळाली संधी
सनरायझर्स हैदराबाद संघाची पहिली चूक –
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सलाही त्याच्या संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम २.२२ अंतर्गत, जो किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आहे, त्याच्या संघाचा हंगामातील हा पहिलाच गुन्हा असल्याने, कमिन्सला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा – Mohammad Shami : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी मोहम्मद शमीची का नाही निवड? अजित आगरकरांनी सांगितलं कारण
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादने इशान किशनच्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर आरसीबीला २३२ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीची एकेकाळी १५.३ षटकांत ३ बाद १७३ अशी अवस्था होती, पण नंतर संघ अचानक पत्त्यांच्या घरासारखा कोसळला. पुढील १६ धावांमध्ये आरसीबीने ७ विकेट्स गमावल्या आणि संपूर्ण संघ १८९ धावांवर बाद झाला. हैदराबादने हा सामना ४२ धावांच्या फरकाने जिंकला.





