IPL Retention Deadline : IPL फ्रँचायझींना BCCI चा मोठा दिलासा! खेळाडू रिटेन करण्याची तारीख अचानक बदलली; पाहा नवी डेडलाईन
IPL Retention Deadline : आयपीएलमधील खेळाडू कायम ठेवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. बीसीसीआयने सोमवारी सर्व संघांना याबद्दल माहिती दिली. यापूर्वीची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर होती, पण आता ती बदलण्यात आली आहे.

BCCI Extends IPL Retention Deadline To November 17 Ahead Of Mini Auction : बीसीसीआयने आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंना रिटेन करण्याच्या अंतिम मुदतीत दोन दिवसांची वाढ केली आहे. २ नोव्हेंबर रोजी बीसीसीआयने सर्व दहा फ्रँचायझींना अधिकृत पत्र पाठवून या निर्णयाची माहिती दिली. या नव्या बदलानुसार, आता सर्व संघांना आपल्या खेळाडूंची अंतिम यादी सादर करण्यासाठी १५ नोव्हेंबरऐवजी १७ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, आयपीएलच्या मिनी लिलावाच्या तारखेत आणि ठिकाणी कोणताही बदल करण्यात आलेला नसून, हा लिलाव नियोजित वेळापत्रकानुसार १६ डिसेंबर रोजी गोव्यातच पार पडणार आहे.
भारत-न्यूझीलंड सामन्यामुळे बदलली अंतिम तारीख –
बीसीसीआयने या डेडलाईनमध्ये बदल करण्याचे मुख्य कारण म्हणजे १५ नोव्हेंबर रोजी होणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम एकदिवसीय सामना. भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून, ४ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. १५ नोव्हेंबरला माउंट मौनगानुई येथे हा सामना खेळवला जाणार असल्याने फ्रँचायझींना खेळाडूंची नावे अंतिम करण्यासाठी दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे. आता सर्व संघ १७ नोव्हेंबरपर्यंत रिटेन आणि रिलीज केलेल्या खेळाडूंची अंतिम यादी सादर करू शकतील.
लिलावाच्या दिवशीच भारत-श्रीलंका लढत; तारखेत बदल नाही
🚨 IPL RETENTION DEADLINE EXTENDED BY 2 DAYS
The new deadline to finalize retentions is November 17
Auction date and venue remain unchanged https://t.co/AdNHqXuInh
— Cricbuzz (@cricbuzz) November 2, 2026
विशेष बाब म्हणजे ज्या दिवशी (१६ डिसेंबर) आयपीएलचा मिनी लिलाव आयोजित करण्यात आला आहे, त्याच दिवशी भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय सामना असूनही बीसीसीआयने लिलावाच्या तारखेत कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे १६ डिसेंबरला मैदानावरील लढतीसोबतच लिलावाच्या टेबलावरही फ्रँचायझींमध्ये चुरस पाहायला मिळेल.
नोंदणी प्रक्रिया सुरू; ३ डिसेंबरला अंतिम खेळाडूंची यादी –
According to reports, BCCI has extended the IPL 2027 player retention deadline by two days, with franchises now required to submit their lists by November 17 instead of November 15.
The IPL 2027 mini-auction will take place in Goa on December 16, with the India-New Zealand fifth ODI reportedly prompting the deadline extension.
— CricTracker (@Cricketracker) November 2, 2026
मिनी लिलावासाठी खेळाडूंच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. फ्रँचायझींसाठी खेळाडूंची यादी देण्याची मुदत १७ नोव्हेंबर असून, खेळाडूंना नोंदणी करण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. यानंतर लिलावात सहभागी होणाऱ्या अंतिम खेळाडूंची यादी ३ डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. लिलावापूर्वी ट्रेडिंग विंडो देखील खुली असल्याने खेळाडूंची देवाणघेवाण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.





