Lizlaz Big Revealed : खळबळजनक! विराट कोहलीला बदनाम करण्यासाठी पत्रकारांनी दिली होती ‘ऑफर’; जर्मन मॉडेलचा मोठा खुलासा
Lizlaz Big Revealed : विराट कोहलीची प्रतिमा डागाळण्यासाठी आणि त्याच्यावर खोटे आरोप करण्यासाठी काही पत्रकारांनी आपल्याला पैशांचे आमिष दाखवले होते, असा खळबळजनक खुलासा लिझलॅझने केला आहे.

Lizlaz’s big revelation about Virat Kohli : भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार विराट कोहलीच्या एका साध्या ‘लाईक’मुळे रातोरात चर्चेत आलेली जर्मन मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर लिझलॅझ (Lizlaz) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, यावेळी चर्चेचे कारण कोणते फोटोशूट नसून तिने केलेला एक खळबळजनक दावा आहे. विराट कोहलीची प्रतिमा डागाळण्यासाठी आणि त्याच्यावर खोटे आरोप करण्यासाठी काही पत्रकारांनी आपल्याला पैशांचे आमिष दाखवले होते, असा खळबळजनक खुलासा लिझलॅझने केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने लिझलॅझच्या एका इन्स्टाग्राम फोटोला लाईक केले होते. त्यानंतर भारतात ‘लिझलॅझ कोण आहे?’ या सर्चची लाट आली होती. ‘फिल्मीमंत्रा’ला दिलेल्या मुलाखतीत लिझलॅझ म्हणाली, “सुरुवातीला मला त्या लाईकबद्दल काहीच माहिती नव्हती. जेव्हा लोकांनी मला फोन करायला सुरुवात केली, तेव्हा मला या गोष्टीची तीव्रता समजली. जर्मनीमध्ये लोक विचारत होते की विराट कोहली कोण आहे? कारण तिथे क्रिकेट इतकं प्रसिद्ध नाही, पण भारतात मात्र वातावरण वेगळंच होतं.”
विराटवर चिखलफेक करण्यासाठी पैशांची ऑफर
View this post on Instagram
लिझलॅझने दावा केला की, या घटनेनंतर अनेक मीडिया आउटलेट्स आणि पत्रकारांनी तिच्याशी संपर्क साधला. ती म्हणाली, “काही पत्रकारांनी मला विराटबद्दल नकारात्मक बोलण्यासाठी आणि त्याने कधीही न केलेल्या गोष्टींचे आरोप करण्यासाठी पैशांची ऑफर दिली. त्यांना विराटवर चिखलफेक करायची होती. पण मी ते का करू? विराट माझा आवडता क्रिकेटर आहे. केवळ पैशांसाठी मी एका चांगल्या व्यक्तीबद्दल खोटं कसं बोलू शकते? मी तसली मुलगी नाही.”
विराट म्हणजे ‘आशियाचा मेस्सी’ –
View this post on Instagram
विराटची पाठराखण करताना लिझलॅझ म्हणाली की, विराट कोहली हा जगातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तींपैकी एक आहे. माझ्या फोटोला लाईक करून तो फेमस झालेला नाही. तो तर ‘आशियाचा मेस्सी किंवा रोनाल्डो’ आहे. त्याने काहीही चुकीचे केलेले नाही. लिझलॅझ सध्या मुंबईत असून तिला बॉलीवूडमध्ये नशीब आजमावायचे आहे. जर चांगली संधी मिळाली, तर मी एका दिवसात हिंदी शिकेन, असा आत्मविश्वासही तिने व्यक्त केला आहे.





