बारामती: माळेगाव साखर कारखाना निवडणूकीसाठी शरद पवार गटाचा बळीराजा सहकार बचाव पॅनल जाहीर

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अजित पवार यांनी निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानेही आपला बळीराजा सहकार बचाव पॅनल जाहीर केला आहे. या निवडणुकीत आता चुरस वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बारामती तालुकाध्यक्ष सतीश खोमणे यांनी पत्रकार परिषदेत बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या उमेदवारांची घोषणा केली. यावेळी विद्यमान संचालक सुरेश खलाटे, गणपत देवकाते यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. शरद पवार गटाने कारखान्याच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचे हित आणि कारखान्याचे भवितव्य डोळ्यासमोर ठेवून उमेदवार निवडल्याचे खोमणे यांनी सांगितले.
बळीराजा सहकार बचाव पॅनलचे उमेदवार खालीलप्रमाणे:
माळेगाव (गट क्रमांक १): अमित चंद्रकांत तावरे, राजेंद्र दौलतराव काटे, श्रीहरी पांडुरंग येळे
पणदरे (गट क्रमांक २): सुशीलकुमार उत्तम जगताप, दयानंद चंद्रकांत कोकरे, भगतसिंग आबा जगताप
सांगवी (गट क्रमांक ३): संजय नामदेव तावरे, राजेंद्र अशोक जाधव, सुरेश तुकाराम खलाटे
खंडज-शिरवली (गट क्रमांक ४): सोपान तुकाराम आटोळे, तानाजी भागुजी पोंदकुले
निरावागज (गट क्रमांक ५): गणपत शंकर देवकाते, शरदचंद्र शंकरराव तुपे
बारामती (गट क्रमांक ६): प्रल्हाद गुलाबराव वरे, अमोल देविदास गवळी
महिला राखीव: शकुंतला शिवाजी कोकरे, पुष्पा मोहन गावडे
इतर मागासवर्गीय: भारत दत्तात्रय बनकर, ज्ञानदेव गुलाबराव बुरुंगले
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग: राजेंद्र श्रीरंग भोसले
निवडणूक प्रक्रिया:
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी २२ जून रोजी मतदान होणार असून, २४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.





