Baramati News: बारामती पोटनिवडणुकीची अपडेट समोर; प्रशासनाकडून तयारीला सुरुवात
Baramati News: निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली असून ती प्रसिद्ध केली आहे.

Baramati News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.
याकरिता निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली असून ती प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार १ जानेवारी २०२६पर्यंत नाव नोंदविलेले मतदार पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार आहेत.
अंतिम मतदार यादीत पुरुष मतदारांची संख्या १ लाख ९३ हजार ४९६, महिला मतदारांची संख्या १ लाख ९० हजार २७१, तर इतर मतदारांची संख्या २४ असून एकूण मतदारसंख्या ३ लाख ८३ हजार ७६७ इतकी आहे.
यानुसार आता बारामतीमधील पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून तयारी सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक नेमकी कधी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला
दरम्यान, बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे.
सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
हेही वाचा:






