Baramti News : बारामतीत स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद
Baramti News : बारामती शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शारदा प्रांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला बारामतीकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

Baramti News : दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शारदा प्रांगण येथे आयोजित करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये एक हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली. ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला. (Baramti News)
शिबिराच्या प्रारंभापासूनच रक्तदात्यांची मोठी गर्दी झाली होती. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उदात्त भावनेतून अनेकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. यावेळी प्रथमच रक्तदान करणाऱ्या युवक-युवतींची संख्या लक्षणीय होती. महिलांचाही सहभाग उल्लेखनीय राहिल्याने संपूर्ण परिसर समाजसेवेच्या वातावरणाने भारावून गेला. (Baramti News)
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते जयदादा पवार, पुणे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोळेकर, नगराध्यक्ष सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशील सोमानी, उपनगराध्यक्षा श्वेता नाळे, माजी पुणे जिल्हाध्यक्ष विश्वासराव देवकाते, माजी नगराध्यक्ष सुभाष सोमानी, प्रसिद्ध व्यापारी किशोर सराफ, माजी नगराध्यक्षा भारती मुथा, दूध संघाचे चेअरमन किशोर फडतरे, तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्यासह आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Baramti News)
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक, विविध सामाजिक संस्था, वैद्यकीय पथक आणि विविध रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे स्वागत करून त्यांचा सन्मान करण्यात आला. (Baramti News)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व रक्तदाते, स्वयंसेवक, सामाजिक संस्था, वैद्यकीय पथक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. समाजहिताचे असे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. (Baramti News)
स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिरातून समाजसेवेचा आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. एक हजारांहून अधिक रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून, या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. (Baramti News)
महिनाभर सामाजिक उपक्रमांची मालिका
दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार पार्थ पवार आणि युवा नेते जय पवार यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने बारामतीमध्ये महिनाभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महारक्तदान शिबिर हा त्यातील प्रमुख उपक्रम ठरला. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा स्व. अजितदादा पवार यांच्या समाजसेवेच्या विचारांवरील विश्वासाचे प्रतीक आहे.पक्षाचे वतीने अकरा हजार वृक्षांचे वाटप करण्यात येणार असून आगामी काळातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांची मालिका राबविण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष ॲड. किरण इंगळे यांनी दिली.
ॲड. किरण इंगळे
शहराध्यक्ष, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी





