बारामती: शहरातून बेपत्ता झालेल्या चार अल्पवयीन मुली सुखरूप परतल्या

बारामती – बारामती शहरातून गायब झालेल्या चार अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात बारामती पोलिसांना यश आले आहे. (Baramati Police) मुलींना त्यांच्या घरी पोचविण्यात आले आहे. बुधवार (दि. 7) शहरातील एका स्कूलमध्ये शिकणाऱ्या 13 ते 15 वयोगटातील चार मुली रात्री नऊ वाजले तरी घरी आल्या नाहीत त्यामुळे चिंतेत असलेल्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. चारही मुलींना अज्ञात व्यक्तीने पळवल्याची शक्यता पालकांनी वर्तवली होती.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलिसांनी लागलीच तपास सुरू केला. तांत्रीक विश्लेषणाचे आधारे सदर मुलींची माहीती घेवून सदरच्या मुली पुणे स्टेशन परिसरात आहेत अशी माहीती मिळवली. मुली कुठे असल्याचे कळताच पुणे शहर बंडगार्डन पोलीसांशी संपर्क केला. व वंडगार्डन पोलीसांनी एक तासात सदर मुलींना ताब्यात घेतले.
बारामती पोलीसांनी त्या चारही मुलींना बारामती येथे सुखरूप आणले व पालकांचे ताब्यात दिले. त्याबाबत पालकांनी पोलीसांचे आभार मानले. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी पाडूळे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके व अंमलदार श्रीकांत गोसावी, बापू इंगोले यांनी केली.





