Baramati News : दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्कमाफी रोखणाऱ्या महाविद्यालयांची चौकशी करा; वैभव सोलनकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Baramati News : बारामती तालुक्यातील काही खासगी महाविद्यालयांकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडे सर्रास परीक्षा शुल्क वसुलीचा तगादा लावला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

Baramati News : शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कमाफी जाहीर केली असतानाही बारामती तालुक्यातील काही खासगी महाविद्यालयांकडून परीक्षा शुल्क भरण्यासाठी तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. (Baramati News)
शासनाच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा तातडीने लाभ द्यावा आणि शुल्कवसुलीच्या तक्रारींची सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. (Baramati News)
राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेल्या राज्यातील २५६ तालुक्यांमध्ये विशेष सवलती लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Baramati News)
यामध्ये पात्र शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कमाफीचाही समावेश आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसेच पुणे विभागीय मंडळानेही पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क न आकारता अर्ज भरून घेण्याबाबत सूचना दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (Baramati News)
फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी पात्र विद्यार्थ्यांना शुल्कमाफीचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाच्या निर्णयानंतरही काही खासगी महाविद्यालयांकडून शुल्काची मागणी होत असल्याच्या तक्रारींमुळे या सवलतींच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Baramati News)
आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागल्यास त्यांच्या शैक्षणिक अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Baramati News)
शुल्कवसुली झाल्यास परताव्याचीही मागणी
शुल्कमाफीस पात्र विद्यार्थ्यांची तातडीने पडताळणी करावी, परीक्षा शुल्क वसूल केल्याच्या तक्रारींची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी आणि संबंधित महाविद्यालयांना लेखी निर्देश द्यावेत, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (Baramati News0
याशिवाय, पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरणे, परीक्षा देणे किंवा प्रवेशपत्र मिळवणे यामध्ये अडथळे येऊ नयेत, तसेच यापूर्वी शुल्क वसूल केले असल्यास नियमानुसार परतावा देण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. (Baramati News)
संबंधित शैक्षणिक संस्थांची तपासणी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागवावा आणि शासनाच्या सवलतींचा लाभ प्रत्येक पात्र विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल, याची खात्री करावी, असेही सोलनकर यांनी म्हटले आहे. (Baramati News)
शासनाचा निर्णय केवळ कागदावर राहता कामा नये.
दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळालाच पाहिजे. कोणत्याही महाविद्यालयाने परीक्षा शुल्काची मागणी केल्यास विद्यार्थ्यांनी माझ्याकडे तक्रार करावी. या प्रकरणाचा पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे वैभव सोलनकर यांनी सांगितले. (Baramati News)
यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर, सरचिटणीस विवेक साळुंके, शहराध्यक्ष अभिषेक चिंचकर, उपाध्यक्ष रोहित शिंदे, तालुकाध्यक्ष जगदीश कोळेकर, पारस हवालदार, प्रतीक पाटील, रघू चौधर, राज देशमाने आदी उपस्थित होते. (Baramati News)





